अकरा जणांच्या टोळीवर मोका कारवाई
सहा अल्पवयीन बालकांचा समावेश चाकण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट
चाकण : संघटितरीत्या टोळी दहशत निर्माण करणाऱ्या चाकण मधील टोळीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोक्का अंतर्गत कारवाई केले आहे . कारवाई करण्यात आलेल्या टोळीमध्ये 11 जणांचा समावेश असून त्यातील सहा जण अल्पवयीन असल्याची माहिती चाकण पोलिसांनी मंगळवारी दिनांक 3 ऑगस्ट दिली आहे .
चाकण मध्ये टोळी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपी संदीप शिंदे याच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे . चाकण येथील संदीप अरुण शिंदे (वय 43 रा . मेदनकरवाडी चाकण )ओंकार मनोज बिसणारे ( वय 20 रा . चाकण )निखिल उर्फ दाद्या रतन कांबळे (वय 20 रा . खंडोबा माळ चाकण ) नामदेव उर्फ नाम्या प्रकाश नाईक वय 21 रा . वाकि खुर्द ता . खेड हर्षद संदीप शिंदे (वय 22 रा. मेदनकरवाडी चाकण )आणि चाकण मधील खंडोबा माळ परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या विरोधात ही मोका कारवाई करण्यात आली .
असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रजपुत व पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी दिली आहे .
सदर टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत ,गंभीर मारहाण, गर्दी मारामारी ,दरोड्याची तयारी , वाहनांची जाळपोळ ,बेकायदेशीर अग्नी शस्त्र बाळगणे असे गंभीर
गुन्हे दाखल आहेत . त्यानुसार ही मोका अंतर्गत कारवाई करण्यात आले आल्याचे पोलिसांनी सांगितले .
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक , अप्पर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कुठे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) अनिल देवरे, सहा . पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व सहा . पोलीस निरीक्षक विजय जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्याने केली.
0 टिप्पण्या