पुणे बेंगलोर महामार्गावर ट्रक ची सहा वाहनांना धडक ,तिघांचा जागीच मृत्यू

 पुणे बेंगलोर महामार्गावर ट्रक ची सहा वाहनांना धडक ,तिघांचा जागीच मृत्यू


प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट

शिरवळ :पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवळ गावाच्या हद्दीत भरधाव वेगातील ट्रकने सहा वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला .या अपघातात एकाच गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी असल्याची माहिती समोर येते मंगळवारी रात्री हा अपघात झाला .


याप्रकरणी अधिक माहिती अशी की साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना भरधाव ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली .यामध्ये दुधाचा ट्रक, मालट्रक, जीप, वॅगनार आणि आणखी दोन अशा सहा वाहनांचा समावेश आहे .या अपघातात वॅगनार कारचा चक्काचूर झाला आहे .  तर इतर गाड्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे . या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे .


दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती . माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्यासाठी पुढाकार घेतला . यातील जखमी नागरिकांना बाहेर काढत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षातआले .अपघाताच्या या घटनेमुळे परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या