बंजारा समाजाची महत्वाची बैठक सपन्न

 बंजारा समाजाची महत्वाची बैठक सपन्न



काल दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी हॉटेल पार्थ रेसिडेन्सी येथे चाळीसगाव तालुक्यातील सकल बंजारा समाजाची बैठक पार पडली.

राज्याचे कॅबिनेट मंत्री मा . ना. श्री . संजयभाऊ राठोड साहेब आणि मा . ना . श्री . इंद्रनीलजी नाईक साहेब तसेच महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाचे सर्व आमदार व महाराष्ट्र सरकार मधील इतर महत्वाच्या पदावरील व्यक्ती यांच्या नागरी सत्काराच्या आयोजना बाबत बैठकीत सविस्तर चर्चा आणि विचार विनिमय करण्यात आले. यावेळेस चाळीसगाव तालुक्यातील बंजारा तांड्यावरील पाणी प्रश्न तसेच विविध महत्वाच्या समस्यांबाबत देखील चर्चा करण्यात आली.सर्वानुमत्ते मे महिन्यात दिनांक 17 किंवा 18 रोजी मा . मंत्री महोदयांचे नागरी सत्कार करण्याचे निश्चित करण्यात आलेले असून,त्याबाबत मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सकल बंजारा समाज , चाळीसगाव यांचे एक शिष्टमंडळ मुंबई येथे मा . मंत्री महोदयांची समक्ष भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरले आहे.

सदर बैठकीस समाजाचे सर्वपक्षीय जेष्ठ नेतेगण, कार्यकर्ते पदाधिकारी,तरुण मंडळी तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक,वैद्यकीय,कायदा आदी क्षेत्रातील समाज बांधव उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळेस समाजातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन करून सदर कार्यक्रम यशस्वी करणे बाबत सर्वानुमत्ते ठरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या