चैतन्य तांडा सरपंच यांचा उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हा परिषद कडून गौरव

 उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरपंच अनिता राठोड यांचा गौरव



चाळीसगाव - घराघरापर्यंत विकासाची वारी नेणाऱ्या चैतन्य तांडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच अनिता राठोड यांनी गावात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी मीनल करनवाळ यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला.

दरवर्षी २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिन देशात मोठय़ा थाटात साजरा करण्यात येतो. जिल्हा परिषद, जळगाव यांच्या वतीने ग्रामस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरपंच यांचा मनोबल वाढविण्यासाठी त्यांचा गौरव केला जातो. त्यानुसार चैतन्य तांडा ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता दिनकर राठोड यांच्या गावातील विकासाची झंझावात पाहून जिल्हा परिषद यांनी त्यांची दखल घेतली. काल गुरुवार रोजी शाहू महाराज सभागृह जि.प. जळगाव येथे CEO मीनल करनवाळ यांनी चैतन्य तांड्याचे सौ सरपंच अनिता राठोड यांना गौरवपत्र देऊन सन्मानित केले. याबाबत पंचक्रोशीतून अनिता राठोड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


दरम्यान जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. यामुळे मला गावात विकास किंवा शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवता आले. आणि याही पुढे मला गावकऱ्यांची सेवा अविरत करण्याची आहे. अशी भावना सरपंच अनिता राठोड यांनी व्यक्त केली आहे. चैतन्य तांड्यात चैतन्य निर्माण करणार्या महीला सरपंच सौ. अनिता दिनकर राठोड 

चाळीसगाव तालुक्यातील शहरापासून जवळच असलेल्या चैतन्य तांड्या म्हणून बंजारा समाज वस्तीचे तांडा वस्ती असलेलं एक खेडे गाव आहे, येथील सरपंच म्हणजे एक महीला आहेत परंतु गाव विकासचे विझन असलं तर एक महीला सरपंच शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्या खेडे गावांचा विकास कसा करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चैतन्य तांडा हे गाव होय गरीबांसाठी विकासाच्या योजना व गावांचा विकास कसा होईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन गांवचा गाढा चालविणे सोपं नाही परंतु सर्वांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत अनेक योजना आपल्या गावांसाठी राबविण्यात आल्या पंतप्रधान योजनेचा आदर्श सरपंच म्हणून सत्काराचे मानकरी ठरले हे एवढे सोपे नाही आज एका छोट्याशा खेड्यांतील एक महिला सरपंच यांना जिल्हा स्तरावर सन्मान होणे म्हणजे अभिमान आहे, अनिता राठोड व त्यांचे पती दिनकर भाऊ राठोड हे भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्ते असून तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या यांचें खंदे कार्यकर्ते आहेत विकास कामांना माध्यमातून आपल्या खेडे गावांसाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सदैव तत्पर असतात आपले पती दिनकर भाऊ राठोड व गावाचे पदाधिकारी ग्रामस्था यांचे मोलाचं सहकार्य अनिता ताई राठोड यांना मिळतं असते असे मावळत्या सरपंच सौ अनिता ताईं राठोड यांनी सांगितले माझ्या गावाच्या विकासासाठी चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश दादा चव्हाण यांचं मोलाचं सहकार्य मिळाले व तसेच माझे पतीराज दिनकर राठोड व उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य सर्वं व ग्रामस्थ यांचे विकास कामांना मला सहकार्य करीत असतात त्याच मार्गदर्शन मला सतत पाच वर्षे मिळाल्याने मी गाव विकासाची कामे पूर्ण करू शकलो असेही राठोड ताईंनी आमचे दैनिक लोकशाही तालुका प्रतिनिधी एम बी पाटील सर यांच्याशी वार्ता लाभ करतांना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या