सायाळा (सू.) येथील गावकऱ्यांचा संपर्क तुटला
प्रतिनिधी : राम शिंदे
तालुक्यातील सायला सुनेगावगाव येथील गावकऱ्यांचा पुलावरून पाणी गेल्यामुळे तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
मागील काही तासापासून गंगाखेड तालुक्यातील काही गावामध्ये सतत संततधार सुरू आहे त्यामुळे गंगाखेड ते सायाळा सुनेगाव येथील गावकऱ्यांचा तालुक्यासाठी जाण्यासाठी संपूर्ण संपर्क तुटलेला आहे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गावकऱ्यांमध्ये दवाखाना, वैयक्तिक काही काम, बाजारपेठ ही तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे दळणवळण ही पुरेशी ठप्प झाली आहे. वारंवार पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पुलाचे काम त्वरीत सुरू करून गावकऱ्यांची समस्स्या सोडवावी अन्यथा आंदोलन केल्या शिवाय प्रयाय नाही अशी गावकऱ्यांची प्रतिक्रिया मांडली.
0 टिप्पण्या