प्रतीक्षा ने वडिलांची केली गरिबी संपवून समाधानकारक प्रतीक्षा

 चाळीसगाव च्या प्रतीक्षा गवळीची आय. टी. क्षेत्रात भरारी गरिबीवर मात करीत केले शिक्षण.....



चाळीसगाव प्रतिनिधी - प्रतिक्षा गणेश गवळी या तरुणीने आपल्या अत्यंत गरिबीच्या परिस्थितीवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करून आज माहिती तंत्रज्ञान (आय.टी) क्षेत्रात उंच भरारी घेतली असून अरिस्टा या कंपनीची ऑफर चालून आली आणि प्रतिक्षाने तिथे इंटरव्यू दिला या कंपनीच्या सर्व नियमात ती पास झाली आणि  कंपनीने चक्क १८५०००० अठरा लाख पंन्नास हजार इतके पॅकेज देऊन तिला नोकरी दिली आहे तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

      शहरातील गणेश आप्पा गवळी हे गॅस एजन्सी मध्ये सिलेंडर उचलण्याचे काम करीत असत सतत बारा वर्षे त्यांनी ही नोकरी करून ६०० रुपये पगार पासून ते १८०० रुपये इतक्या मोजक्या पगारावर त्यांनी  काम केले

2 मुले 1 मुलगी व पत्नी सोबत 

गरीबीत संसार केला

गणेश आप्पांना उद्योजक वर्धमान भाऊ धाडीवाल यांनी भक्कम साथ दिली. व प्रतीक्षा ला वेळोवेळी  मार्गदर्शन केेेले तिला दहावीला

बोर्डात 95 टक्के मार्क मिळाले मुलीची अभ्यासातील ओढ आणि हुशारी पाहून गणेश आप्पांनी तिच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष देण्याचे ठरविले आणि तिला सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्यासाठी पाठवले 2021 मध्ये प्रतीक्षा या कॉलेजमध्ये चांगल्या कौशल्याने पास झाली आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये व्हेरीटास कंपनीने तिला १०७५०००( दहा लाख पंचाहत्तर हजार ) रुपयांचे पॅकेज देऊन नोकरी दिली प्रतीक्षाने या कंपनीत अत्यंत मन लावून काम केले कोरोना काळात वर्क फ्रॉम होम या नियमा खाली देखील ती घरी राहुन निष्ठेने काम करीत होती जवळपास सहा महिने या कंपनीत काम केल्यानंतर तिला अरिस्टा या कंपनीची ऑफर चालून आणि आणि प्रतिक्षाने तिथे इंटरव्यू दिला या कंपनीच्या सर्व नियमात ती पास झाली आणि  कंपनीने चक्क १८५०००० अठरा लाख पंन्नास हजार इतके पॅकेज देऊन तिला नोकरी मिळाली. आज गवळी समाजात एवढे मोठे पॅकेज घेणारी जळगाव जिल्ह्यातील एकमेव मुलगी प्रतीक्षा ठरली आहे. 

आपल्या वडिलांच्या गरिबीची आणि मेहनतीची जाणीव ठेवून अत्यंत कष्टाने इथपर्यंत यशस्वी मजल मारलेल्या प्रतिक्षा गणेश आप्पा गवळी हिचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजसेवक वर्धमानभाऊ धाडीवाल, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल, संभाजी सेनेचे लक्ष्मण बापू शिरसाठ, सेनेचे दिलीप घोरपडे, दिप्स चायनीज चे मुराद पटेल, आरिफ खाटीक, विजय गायकवाड, रहा अपडेट व्हाट्सअप ग्रुप आदिंनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या