कळवण तालुक्यातील पुणेगाव येथील अंत्योदयाच्या धान्याची लाभार्थ्यांना विक्री
( कळवण प्रतिनिधी ) अनिल ठाकरे
परवाना रद्द करण्यासाठी अहवाल
कोरोन काळात गरिबांसाठी राज्य शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब स्वस्त धान्य कार्डधारकांना मोफत तांदूळ व गहू आले होते .मात्र कळवण तालुक्यातील पुणेगाव येथील इंदिरा महिला बचत गटाचा स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना हे धान्य विकल्याचे लक्षात आल्यावर संतप्त आदिवासी बांधवांनी तहसीलदार व पुरवठा अधिकार्याकडे तक्रार केली होती .या प्रकारची दखल घेऊन पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन पाहणी केली. दप्तर तपासले असता त्यात अनेक अडचणी व त्रुटी आढळून आल्याने संपूर्ण दप्तर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.व दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्याचा अहवाल वरिष्टांना पाठविण्यात आला आहे.
पुणेगाव येथील स्वस्त धान्य दुकानात एकूण ९२० लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंबासाठी तांदूळ ८.९० क्विंटल व गहू १३.७० क्विंटल तर अन्तोदय कुटुंबासाठी तांदूळ ६.५० क्विंटल व गहू ९.७० क्विंटल मे २०२१ या महिन्यात मोफत वाटपासाठी आले असता मात्र स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना मोफत धान्याची माहिती दिली नाही. व हे मोफतचे धान्य गावातील (११४ ) कुटुंबातील लाभार्थ्यांना २५ मे रोजी पैसे घेऊन विक्री केल्याचा आरोप गंभीर प्रकार उघडकीस करण्यात आला. व या प्रकारामुळे संतप्त रहिवासी व नागरिकांनी फसवणुकीबाबत विचारणा केली असता दुकानदाराने उडवाउडवीचे उत्तरे दिली. नागरिकांनी एकत्र जमून एकमुखी आवाज उठविला होता.या बाबत शासनाने सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची आदेश देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या