केळी पिकाच्या नुकसान पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननिय देवेंद्र फडणवीस साहेब..
------------------------
तांदलवाडी ता. रावेर - गेल्या चार दिवसांपूर्वी चक्रीवादळाने मुक्ताईनगर ,रावेर तालुक्यातील हजारो एकर शेतातील कोट्यावधी रुपयांचे केळी पिकांचे नुकसान झाले होते. आज पिकांची नुकसानीची पाहणी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्यक्ष बांधावर जावून संवाद साधला. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचा दिलासा त्यांनी दिला. उचंदे, शेमळदा,मेंढळदा, नायगाव, वाघाडी, धामोडी, कोळदा, सुलवाडी, ऐनपुर, तांदळवाडी परिसरातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यानंतर तांदळवाडी येथील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या निवासस्थानी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार गिरिशभाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, जी.प.अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, आमदार मंगेश चव्हाण,माजी आमदार स्मिता वाघ, जीप उपाध्यक्ष लालचंद पाटील आदि मान्यवरसह उपस्थीत होतो..
0 टिप्पण्या