चाळीसगाव हार्डवेअर व मर्चंट असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले जन आरोग्य संकुल कोविड सेंटरला कोंन्सट्रेटर भेट .

 खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या वतीने हार्डवेअर मर्चंट चे आभार


चाळीसगाव हार्डवेअर व मर्चंट असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले जन आरोग्य संकुल कोविड सेंटरला कोंन्सट्रेटर भेट .





रविंद्र वाडेकर काकांनी दिलेले 25 बायप्पॅप मास्क वैद्यकिय अधिकारी यांचे कडे सुपूर्द 


 चाळीसगाव -  महात्मा फुले जन आरोग्य संकुल भव्य दिव्य वास्तूची  भौतिक सुविधा उपलब्ध असल्याने कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी व सेवेसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या दूरदृष्टी नियोजनातून तयार झालेली  महात्मा फुले जन आरोग्य संकुलात आज हार्डवेअर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक येवले, सचिव महेश पाटील व संचालकांच्या वतीने आज ओटू कोंन्सट्रेटर भेट  देण्यात आले. या सर्व मान्यवरांचा कृतज्ञता सत्कार पंचायत समितीचे उपसभापती सुनिल पाटील ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काकाजी जैन, पी एम फॉर मोदी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शैलजा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंगेश वाडेकर यांचे वडील तथा सेवानिवृत्त बँक अधिकारी रवींद्र वाडेकर यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे आपल्या सौभाग्यवतीच्या स्मरणार्थ  25 बायप्पॅप मास्क शहरातील रुग्णांना स्वेच्छेने व स्वखर्चाने भेट दिले. प्रकृती बरी नसल्याने ते आपल्या माध्यमातुन कोविड सेंटरला सुपूर्द करावे अशी इच्छा  रवींद्र वाडेकर काका यांनी व्यक्त केली होती. या भावनेचा आदर करीत  खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कार्यकर्त्यांकरवी ही भेट ट्रॉमा केअर सेंटरकडे सुपूर्द करण्यात आली. या दोन्ही भेटवस्तूचा स्वीकार ट्रामा केअर सेंटर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबेळकर,समुपदेशक रणजित गव्हाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपा जेष्ठ कार्यकर्ते बंडूदादा पगार, लोंजे ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, उद्योजक हेमचंद्र चौधरी, रोहिणीचे सागर भाऊ मुंढे  यांच्यासह चाळीसगाव हार्डवेअर मर्चंट असोसिएशनचे संचालक व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या