भाजपा चाळीसगाव दोन दिवसांचे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा आज समारोप झाला

 भाजपा चाळीसगाव दोन दिवसांचे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा आज समारोप झाला.


या दोन दिवसात विविध विषयांवर उत्कृष्ट वक्त्यांनी मार्गदर्शन केले.आज ताईसाहेब  देवयानी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पोपट तात्या यांनी कर्यकर्त्याने शासकीय योजनांचे लाभ जनसामान्यांपर्यंत पोहचिण्यासाठी काय करावे ,अंत्योदय कशाप्रकारे होईल .शासनाने शेवटच्या व्यक्तीचा विकास व्हावा यासाठी केलेल्या कामांचा आढावा सादर केला.तदनंतर खासदार उन्मेष दादा यांनी  के बी दादा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आत्मनिर्भर भारत या विषयावर सखोल मार्गदर्शन करून ,हे साध्य करून कशाप्रकारे शेवटच्या घटकाचा विकास करणे केंद्रातील मोदी सरकार चा वर्तमान आणि  भविष्यातील वाटचाल या विषयी माहिती दिली.हे करीत असताना कार्यकर्त्याने डोक्यावर बर्फ,तोंडात साखर आणि प्रवास या गोष्टी आत्मसात करून आत्मनिर्भर होण्याप्रती कार्य करण्याचे आवाहन केले.. आमदार मंगेश दादा यांनी राज्यातील राजकीय पार्श्वभूमी व पक्षाची भूमिका..या विषयावर माहिती देताना,भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला असतानाही कशाप्रकारे काही संधिसाधू लोकांनी सत्ता उपभोगासाठी आपली विचारधारा बाजूला ठेवून स्वतः आणि कुटुंबाचे हित प्राधान्य देऊन सत्ता काबीज केली..भाजपा कशाप्रकारे धडा घेऊन स्वबळावर प्रगती करणारयासह भाजपा हा सुरवातीपासूनच कार्यकर्त्यांचा पक्ष असून या पक्षात घराणेशाहीला कोणताही वाव दिला जात नाही* केवळ सर्वात्तम व्यक्तीला प्राधान्य दिले जाते..याचमुळे माझ्यासारखा सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार होऊ शकला..असे प्रतिपादन केले..प्रशिक्षण शिबिराचा समारोप गटनेते संजय भास्कर आणि शेषराव बापू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष राजू मामा यांच्या भाषणाने  झाला.त्यात त्यांनी कार्यकर्ता हा व्यक्ती विशेष च्या नावाचा जय करून स्वहित साधणारा नसून जनसामान्य हितासाठी पक्षाचा अभिमान वाढविणारा, पक्षाच्या नावाचा जय करणारा असावा असे सांगितले,शेवटी कार्यकर्त्यांमुळे च आम्ही लोकप्रतिनिधी झालोय,आणि सध्याचा काळ हा कार्यकर्त्यांचा निवडणुकीचा म्हणजेच स्थानिक निवडणुकांचा आहे ,त्या निवडणुकांसाठी आम्ही आमचे कर्तव्य म्हणून कधीही कार्यकर्त्यांसाठी तयार आहोत फक्त तुम्ही योग्य नियोजन करा...योग्य नियोजन,शिस्त, पक्षादेश यांच्या आधारे आपण सहज विजयी राहू असेही त्यांनी सांगितले..आभार समारंभ तालुकाध्यक्ष निकम सर यांनी करून कार्यक्रम संपला..संपूर्ण शिबिराचे योग्यरित्या नियोजन करण्यासाठी तालुकाध्यक्ष निकम सर,शहराध्यक्ष घृष्णेश्र्वर तात्यासाहेब संयोजक गिरीश बऱ्हाटे सह संयोजक नानकर दादा,अमोल चव्हाण,जितू दादा वाघ,धनंजय आपा मांडोळे,योगेश दादा खंडेलवाल राकेश जी बोरसे यांच्यासह युवा मोर्चाचे भावेश कोठावदे,सुनील पवार शहर सोशल मिडीया प्रमुख प्रविण मराठे,तालुका सोशल मिडीया प्रमुख बाजीराव अहिरे आणि संपूर्ण टीम ने केलेले सुयोग्य नियोजन यामुळे हे शिबिर सर्व कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणीच ठरले ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या