चाळीसगाव येथे भाजपाचे वीजबिल होळी आंदोलन

 

चाळीसगाव वार्ताहर-लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांना आलेली जादा व अन्यायकारक वीजबिल माफ करण्यात यावेत, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्हावा आदी विविध मागण्यांसाठी आज दिनांक 23 नोव्हेंबर 2020 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टी, व भारतीय जनता युवा मोर्चा चाळीसगाव शहर व ग्रामीण मंडळाच्या वतीने  तहसीलदार कार्यालयासमोर "वीजबिल होळी आंदोलन" करण्यात आले. 
 सरकारने दिलेल्या वचनाला टिकाव अशी अपेक्षा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी व्यक्त केली, तर सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील निकम यांनी दिला. सदर आंदोलनासाठी पं स गटनेते संजय पाटील, भाजपचे नगरसेवक नितीन पाटील, बापू अहिरे, भास्कर पाटील, मानसिंग राजपूत, सरचिटणीस धनंजय मांडोळे, योगेश खंडेलवाल, युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे, तालुकाध्यक्ष सुनील पवार, यांच्यासह संदीप पाटील, भरत गोरे, सौरभ पाटील, धीरज पवार, कैलास पाटील, सुबोध वाघमारे, विकी देशमुख, संदीप राणा, मनोज गोसावी, विजय जाधव, गौरव पुरकर, ऍड भागवत पाटील, धनंजय सूर्यवंशी आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या