देशातील मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध :- डॉ.भारती पवार



आज ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथील प्रसूती विभाग व शस्त्रक्रिया विभागाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांचे हस्ते आज संपन्न झाला.



ग्रामीण रुग्णालयांमधील प्रसूती सेवांचास्तर उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रयत्न करण्यात येत आहेत. या ग्रामीण रूग्णालयातील विस्तारीत प्रसुतीगृहांच्या रूपाने ग्रामीण भागातील महिलांना शासनाकडून आरोग्यदायी भेट उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

यावेळी जयश्रीताई दौंड, गणेश शिंदे,पंकज खताळ,जय फुलवाणी,दत्तराज छाजेड, निकम महाराज,नितीन पांडे, सजन तात्या कवडे, अकबर शेख, नितीन परदेशी, दीपक पगारे,प्रमोद जाधव, उमेश उगले, सागर फाटे,व्यवहारे वकील, संजय सानप तसेच शिवसेनेचे किरण देवरे, राजाभाऊ जगताप,सुनील जाधव,सागर हिरे,तुसे मॅडम सह रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या