पुणे प्रतिनिधी : विकास आल्हाट
पुणे जिल्हा परिषद शाळा, वाबळेवाडी ही भारतातील आदर्श ग्रामीण शाळा म्हणून प्रसिद्ध असून तिच्या आधुनिक, प्रयोगशील आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीमुळे ती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय ठरली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी म्हणून शाळेत विशेष “करिअर गाईडन्स सत्र” आयोजित करण्यात आले. या सत्रासाठी श्री. चंद्रकांत मोटे सर यांना मान्यवर मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.मोटे सर समर्थ सोशल फाउंडेशनचे मोठे पदाधिकारी असुन त्यांनी आतापर्यंत अनेक लोकांना व्यसन मुक्त व मधुमेह मुक्त केले आहे.
या सत्रात मोटे सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “यश मिळवण्यासाठी शिक्षणासोबतच आत्मविश्वास, शिस्त आणि स्वप्नांवर विश्वास असणे आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजनाचे महत्त्व समजावून सांगत विज्ञान व तंत्रज्ञान, व्यवसाय व उद्योग, आरोग्य सेवा, कला आणि संस्कृती तसेच कृषी व ग्रामीण विकास या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबद्दल सविस्तर माहिती दिली.
या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि स्वतःच्या आवडीच्या क्षेत्राची निवड करण्यासाठी प्रेरणा घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे शिक्षकवर्ग, पालक व आयोजक समिती यांनी मोटे सरांचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमामुळे वाबळेवाडी शाळेने पुन्हा सिद्ध केले की ग्रामीण भागातील विद्यार्थीही योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक शिक्षणाच्या साहाय्याने जागतिक स्तरावर यश संपादन करू शकतात.
“विद्यार्थ्यांचे करिअर म्हणजे देशाचे भविष्य — आणि वाबळेवाडी शाळा हेच उज्ज्वल भविष्य घडवत आहे.”
पुणे जिल्हा परिषद शाळा, वाबळेवाडी
ता. शिरूर, जि. पुणे



0 टिप्पण्या