कंटेनर अपघातामधील जखमी मुलीचा मृत्यू ; आठ दिवसापूर्वी झाला होता अपघात

 कंटेनर अपघातामधील जखमी मुलीचा मृत्यू ; आठ दिवसापूर्वी झाला होता अपघात 



चाकण : प्रतिनिधी (योगेश आल्हाट)

चाकण शिक्रापूर रस्त्यावर 16 जानेवारी रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातातील जखमी मुलीचा गुरूवारी (दिनांक 23) उपचारा दरम्यान मृत्यू झाला . धनश्री अंबादास गाढवे (वय 7 रा. रासे ,ता.खेड जि. पुणे )असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे .


चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनश्री ही आपली आई आणि आईची मैत्रीण यांच्यासोबत १६ जानेवारी रोजी दुचाकीवरून चालली होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या HR 55 AV 2283 या कंटेनर ने धनश्री ची आई चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्या तिघीही जखमी झाल्या. धनश्री हिच्यावर पिंपरीतील डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते .

भरधाव वेगातील या कंटेनर ने पोलिसांच्या गाडीसह अनेक वाहनांना धडक दिली. या प्रकरणी कंटेनर चालकावर सरकारी कामात अडथळा आणणे, अपघात करणे, असे दोन गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर शिक्रापूर पोलीस ठाण्यातही अपघाताचा गुन्हा दाखल आहे. 


एका डंपरला धडक दिल्यानंतर कंटेनर बंद पडला. त्यावेळेस तिथे असलेल्या नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झालेल्या झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते दरम्यान हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या