वडाळे - वडाळी येथील चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या नवीन रेल्वे बोगद्यातून बस काढण्याचे प्रयत्न असफल...
रेल्वेने पर्याय न काढल्यास रयत सेना व वडाळे वडाळी ग्रामस्थांचा रेल रोकोचा इशारा....
चाळीसगाव प्रतिनिधी - तालुक्यातील वडाळा-वडाळी गावाजवळील तिसऱ्या लाईनसाठी रेल्वे बोगदा तयार केला आहे.मात्र सदरच्या बोगद्यातून एस टी तसेच अन्य वाहने पास होणे अवघड असल्याकारणाने रयत सेना व विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायत सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे चाळीसगाव आगार व्यवस्थापक यांना दि २९ रोजी निवेदनाद्वारे एस टी सुरू करण्याची मागणी केली होती त्यानुसार वडाळे वडाळी गावाचे ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाच्या उपस्थितीत एसटी आगाराचे अधिकारी , कर्मचाऱ्यांंनी एस टी चे डेमो प्रात्यक्षिक केले .मात्र बोगद्यातून एस टी पास झाली नसल्याने रेल्वेने केलेल्या चुकीच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचं नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत रेल्वे गेट क्र १२३ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केल्यानंतर रेल्वे इंजिनअर ठाकूर यांनी रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना एस टी बोगद्यातून पास होत नसल्याचे कळवितो तसेच रेल्वे गेट सुरू करण्याची मागणी वडाळे वडाळी ग्रामस्थांची असल्याचे सांगतो असे आश्वासन दिले आहे,मागणी दखल न घेतल्यास रयत सेना व विद्यार्थीसह ग्रामस्थ रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी रेल्वे विभागाला दिला आहे.
रयत सेना व वडाळे वडाळी गावाचे विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी दि २९ रोजी वडाळा गावासाठी एस टी सुरू करण्याची मागणी केली होती.त्याची तात्काळ दखल घेत दि ३० रोजी चाळीसगाव आगाराचे व्यवस्थापक मयुर पाटील व सहा. वाहतूक निरीक्षक शुभम झगडे,वाहतूक नियंत्रक एफ एस मुल्ला,चालक राकेश पाटील यांनी वडाळे वडाळी चे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत एस टी चालक किशोर पाटील यांनी बोगद्यातून एस टी काढण्याचा सलग ८ वेळा प्रयत्न केला मात्र बोगद्यातून एस टी जात नसल्याने उपस्थित रेल्वे इंजिनिअर ठाकूर यांना सरपंच अनिल पाटील, ग्रा. प. सदस्य विकास आमले,पोलीस पाटील, निलेश पाटील, खांदेश नगरीचे संपादक रामलाल चौधरी यांनी रेल्वे विभागाच्या वतीने चुकीचा बोगदा बनविल्यामुळे एस टी बोगद्यातून जात नसल्याने रेल्वे इंजिनिअर यांना सांगत तुमच्या समोर एसटी आगाराने वडाळे वडाळी येथील रेल्वे बोगद्याजवळ एस टी ची प्रात्यक्षिक करून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु एस टी पुढे जात नसल्याने रेल्वे प्रशासनानेच त्यातून मार्ग लवकरात लवकर काढावा अशी मागणी निवेदन देत रेल्वे गेट पूर्ववत सुरु करावे अन्यथा रयत सेनेसह ग्रामस्थांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन केले जाईल असा इशारा सरपंच अनिल पाटील, मा सरपंच धर्मराज अहिरराव , ग्रा प सदस्य विकास आमले,रवींद्र आमले,बापु आमले ,शिवाजी आमले,शरद अहिरराव, गोपाल आमले, बाबाजी सुर्यवंशी, वाल्मीक आमले, नाना मोरे, चेतन अहिरराव, मनोज शेवरे यांच्यासह ग्रामस्थ व रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या