हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (ST) आरक्षणासाठी वसईत बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा
हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळविण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजातर्फे भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “एक गोर सव्वा लाखेर जोर” आणि “अभी नहीं तो कभी नहीं” या घोषणा देत समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
हा मोर्चा मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरुवात वसईगाव बस डेपो येथून होऊन तहसील कार्यालय येथे होईल. या मोर्चात बंजारा समाजातील सर्व कुटुंबिय, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून समाजातील एकता आणि आरक्षण हक्कासाठीची लढाई जोरदारपणे व्यक्त केली जाणार आहे.
बंजारा समाजाने यापूर्वीही विविध ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठविला आहे. या मोर्चाद्वारे सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाची अंमलबजावणी करावी, ही समाजाची ठाम मागणी आहे.
या आंदोलनाचे आयोजन सकल बंजारा समाज, वसई तालुका तर्फे करण्यात आले असून आयोजकांनी सर्व समाजबांधवांना एल्गार मोर्चात सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
------------------------------जाहिरात--------------------------




0 टिप्पण्या