रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे एक जुलै हा वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये असलेला दिवस साजरा!
आज रोटरी क्लब तर्फे कृषीदिन , डॉक्टर्स डे, सनदी लेखापाल (C.A.) दिवस साजरा करताना कृषी क्षेत्रामध्ये जे शेतकरी स्वतः शेती करून हे 100 ते 200 लोकांना रोजगार देतात व शेतीशी निगडित व्यवसाय करतात. अशा उद्योजक शेतकऱ्यांचा म्हणजे ऊसतोड मुकादमांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संदीप पाटील साहेब पोलीस निरीक्षक चाळीसगाव उपस्थित होते.
तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा देखील प्रमुख अतिथी निष्णात डॉक्टर श्री जयवंत देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याचबरोबर अकाउंट क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करणाऱ्या सीनियर अकाउंटंस यांचा सन्मान सनदी लेखापाल मा.श्री निलेश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. रोटरीचे नूतन अध्यक्ष श्री ब्रिजेश पाटील यांच्या संकल्पनेतून हा दिवस साजरा करताना प्रास्ताविकात त्यांनी या दिवसाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संदीप पाटील साहेब, पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांनी शेतकऱ्यांच्या सन्मानावर त्यांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी ने केलेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात व अकाउंट या क्षेत्रात काम करण्याचा सत्कार करून रोटरी ने सामाजिक बांधिलकी निर्माण केल्याचं त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल. डॉक्टर जयवंत देवरे यांनी आजकाल ताणतणावामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत त्याची आपण काळजी घ्यावी व निरोगी आरोग्य ठेवावं हे आपल्या मनोगतातून व्यक्त केलं.
माननीय श्री निलेश गुप्ता यांनी कृषी वैद्यकीय व अकाउंट ह्या तिघी क्षेत्रांच वैशिष्ट्य आपल्या मनोगतातून व्यक्त केल. सत्कारालाउत्तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून विश्वजीत पाटील यांनी रोटरीचे आभार मानून दिले . सत्कारार्थी प्रवीण पिंगळे व खैरनार यांनी देखील सत्कार बद्दल आभार व्यक्त केले.तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सहाय्यक प्रांतपाल रवींद्र शिरोडे यांचा देखील सत्कार करण्यात
आला.याचबरोबर रोटे एस.एस. धामणे साहेब, डॉक्टर रोटे.सुनील राजपूत ,डॉ. सत्यजित पूर्णपात्रे, रोटे अनिल मालपुरे यांचा देखील यतोश्चित सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन रवींद्रजी निकम व निलेश शर्मा यांनी केले. प्रकल्प प्रमुख कांतीलाल पटेल, व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण रोटरी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार रोटरी सचिव चंद्रेश लोडाया यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0 टिप्पण्या