चाळीसगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा

 नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळा देवळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



  चाळीसगांव  :  नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री.सतिष पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक श्री. तुषार खैरनार यांनी दिपप्रज्वलन करून प्रतिमापूजन केले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. ऋषिकेश सूर्यवंशी यांनी ध्वजारोहण केले.

           शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध लेझीम नृत्य, देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटक व कला सादर केल्या. तसेच रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन देखील करण्यात आले. विविध क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत देवळी यांच्याकडून सत्कार देखील करण्यात आला.

       प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री.कैलासबापू सूर्यवंशी यांनी तसेच संस्थेच्या संचालिका माईसाहेब जयश्री सूर्यवंशी सचिव आदित्य सूर्यवंशी यांनी विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या