दिनांक : ०८/०७/२०२३
नाशिक प्रतिनिधी
आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथे महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2023 सोहळा संपन्न झाला. उद्योग तसेच समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा उद्योजकांना पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले. अभिनेत्री तेजस्विनी पंडित,मुनमुन दत्ता देखील या सोहळ्याला उपस्थित होत्या.
भारतामध्ये आर्थिक आघाड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत देशात कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत तसेच देशात रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात जात आहेत. यामुळे भारताची आर्थिक क्रियाशीलता कायम राहण्यास मदत होईल. भारताला स्वावलंबी बनविण्याची महत्वाकांक्षा बाळगून नव्या जागतिकीकरणाच्या समिकरणात भारत अधिक सक्षम होईल असे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
यावेळी Reseal Award CEO सुधीर पठाडे, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

0 टिप्पण्या