रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आयोजित स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली माध्यमिक विद्यालयाचा ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक...

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आयोजित स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली माध्यमिक विद्यालयाचा ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक...


प्रतिनिधी - रामदास गाडर 

मोखाडा दि.7 जुलै , स्पर्धेच्या या युगात स्पर्धा परीक्षेचे महत्व अगदी माध्यमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना कळावे त्याअनुषंगाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी जनरल नॉलेजचे विषय देऊन बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा आयोजित केली होती. या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक -105,

घणसोली माध्यमिक विद्यालयाने ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

             रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत - जी 20 परिषद या विषयासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक - 105 च्या माध्यमिक विद्यालयातील कु.प्रिन्स शिवा पवार इयत्ता- 10 वी कु.अक्षदा संतोष महानवर इयत्ता - 10 वी या मुलांनी प्रथम प्रथम क्रमांक पटकावून दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले आहे. शाळेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक -  श्री.अशोक मधुकर सोनवणे सर, वर्गशिक्षिका - सौ. मालती किशोर पाटील मॅडम व श्री.शशिकांत निवृत्ती गारे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर शाळेचे विद्यार्थी हे राज्य पातळी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून राज्यपातळीची ही स्पर्धा पुढील 14 जुलै रोजी होणार आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून या विद्यार्थ्यांना राज्यपातळीच्या स्पर्धेकरिता  विद्यार्थी,शिक्षक व पालक यांच्या वतीने प्रचंड पाठींबा व शुभेच्छा मिळत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या