टाकळी प्र.चा.येथील माऊली कृपा नगर-सैनिक काॕलनी मध्ये मा.आमदार मंगेशदादाचव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून मा.आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते खरजई रोड ते सैनिक काॅलनीला जोडणारा बहुउपयोगी मुख्य रिंग रोड रस्त्याचे लोकार्पण बरोबर माऊली कृपा नगर व सैनिक काॅलनी फलक उदघाटनासह माऊली कृपा नगर येथे नियोजित महादेव मंदिर भुमिपुजनासह येथील गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री जी .एन .राजपूत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ. मंगेशदादा चव्हाण,माजी पंं स.सभापती श्री संजय पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम माजी पं.स.सदस्य श्री जगन्नाथ महाजन,ग्रा.पं.सदस्य श्री भावेश कोठावदे, विजय पवार,बाबूभाई आचारी,ॲड कैलास अगोणे आदी मान्यवर उपस्थित होते....
30 मी रस्त्यावरच ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून..दादांचे स्वागत करण्यात आले ..काॕलनीतील एका विद्यार्थीनीने दादांचे औक्षण केले... परिसरातील सर्व रहिवाशीच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागतकेले तद्नंतर माऊली कृपा नगर व सैनिक काॕलनी पाटी रितसर अनावरण करण्यात आले...
मा.आमदार साहेब व मान्यवर यांचे सभामंडपात आगमन झाल्यावर
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
देशसेवेवर कार्यरत असताना वीरमरण आलेल्या शहीद सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर मा.आ.मंगेशदादा चव्हाण यांनी येथे माऊली कृपा नगर व सैनिक काॅलनीसह इतर काॅलनींना जोडणारा मुख्य रस्ता अवघ्या दोन महिन्यात मंजुरी देत तात्काळ पूर्ण केला म्हणून त्यांचा व श्री भावेश कोठावदे यांचा ऋण निर्देश व्यक्त करत वटवृक्ष देऊन सामुदायिक सत्कार करण्यात आला तसेच इतर मान्यवर यांचा देखील सत्कार करण्यात आला.तसेच काॅलनीतील विविध शिक्षण क्षेत्रातील १५ गुणवंत विद्यार्थीचा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते स्मृती चिन्ह गुलाबपुष्प देऊन कौतुक करण्यात आले.


0 टिप्पण्या