मुंबई विद्यापीठातील सहाय्यक प्रा.चेतन गुराडा यांनी संपादन केली भौतिकशास्त्रातील पी.एचडी...

 मुंबई विद्यापीठातील सहाय्यक प्रा.चेतन गुराडा यांनी संपादन केली भौतिकशास्त्रातील पी.एचडी...


मुंबई दि. 27 जुन, मुंबई विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील कार्यरत सहाय्यक प्राध्यापक प्रा. चेतन गुराडा यांनी 

भौतिकशास्त्र विषयात पी.एचडी. संपादित केली आहे. प्रा.चेतन गुराडा यांचा पी.एचडी.चा संशोधन विषय - नॅनोस्ट्रक्चरड मटेरिअल आणि जैव उतींच्या (टिशू) नॅनोमॅकेनिकल, विस्कोईलास्टीक आणि नॅनोट्रायबोलॉजीकल गुणांचा   अभ्यास असा होता. या संशोधनाकरिता त्यांना डॉ.कोठारी सर यांचे मार्गदर्शन लाभले. या विषयामध्ये प्रामुख्याने नॅनोमीटर जाडीच्या क्रोमियम आणि टायटेनिअम आधारीत मल्टिलेयर कोटींगच्या मॅकेनिकल प्रॉपर्टी /काठिण्य आणि ओस्टीओपोरेसिस/ अस्थीरोग तसेच मलेरिया मुळे होणाऱ्या लाल रक्तपेशींच्या कठिण्यातील बदलांचा नॅनोइंडिन्टेशन तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास करण्यात आला. सदर विषयाचे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. प्रा.चेतन गुराडा हे अतिशय अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व असून ते कायम समाज बांधवाना सामाजिक व शैक्षणिक मार्गदर्शन करत असतात.

        प्रा.चेतन गुराडा यांनी मिळवलेल्या भौतिकशास्त्रातील पी.एचडी.मुळे त्याचे शैक्षणिक व सामाजिक स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या