जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी :- डॉ. भारती पवार
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतून विविध कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त पत्र प्रदान करण्यात आली कळवण येथील या रोजगार मेळाव्यामध्ये विविध औद्योगिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भारती पवार म्हणाले की डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी कौशल्य प्रशिक्षणामुळे आता विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत आज आपला देश अशा टप्प्यावर आहे की भारतातील कुशल मनुष्यबळाला परदेशात मोठी मागणी आहे औद्योगिक प्रशिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी विविध परकीय भाषा ही शिकाव्यात त्या क्षेत्रातही परदेशात चांगल्या संधी उपलब्ध आहेत विविध क्षेत्रात अनेक अनेक संधी आहेत मात्र विद्यार्थ्यांनी तिथपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे प्रशिक्षित युवकांना रोजगाराची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे विविध कंपन्यांनाही कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे आपले कौशल्य वाढवून अनुभव घेऊन विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे त्या म्हणाल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर,दिपक खैरनार,नंदू खैरनार, सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, रमेश थोरात, एस. के. पगार, विकास देशमुख, नारायण नाना, राजू पगार, सुभाष शिरोडे, निंबा पगार,हेमंत रावले, चेतन निकम, के.के. शिंदे, धर्मा अण्णा देवरे, दत्तू देवरे, दिपक वेढणे, विकिल पाटील, पंडित देवरे तडगे मॅडम,नलावडे साहेब, एस. एच. भामरे, पी. एम. वाकडे सहित मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.



0 टिप्पण्या