जलसंधारण जि प उपविभाग (ल पा) चाळीसगाव कार्यालयाकडून चक्क खासगी हॉटेल ला पाणी पुरवठा...
चाळीसगाव : (सौजन्य: सूर्यकांत कदम) - शहरातील जलसंधारण जि प उपविभाग (ल पा) चाळीसगाव कार्यालयाकडून गेल्या अनेक वर्षांपासून खासगी चहाच्या हॉटेल ला पाणी पुरवठा केला जात होता ही बाब दि 20 रोजी नागपालिकाने हॉटेल चे अतिक्रमण काढल्यावर उघडकीस आली आहे.
शासकीय कार्यालयाला पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून शासनातर्फे पाणी पाईप लाईन घेऊन संबंधित कार्यालयाला पाणी पुरवठा केला जातो मात्र चाळीसगाव शहरातील जलसंधारण जि प उपविभाग (ल पा) चाळीसगाव कार्यालयाकडून स्वतः च्या फायद्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करून गेल्या काही वर्षांपासून खासगी चहाच्या हॉटेल ला ऑफिस च्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जात होता ही बाब अनेक वर्षांपासून लपून होती मात्र दि 20/4/2023 रोजी संबंधित हॉटेल चे अतिक्रमण नगरपालिका ने काढल्यावर ही बाब आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः च्या फायद्यासाठी शासनाच्या कार्यालयातील पाण्याच्या टाकिमधून खासकी हॉटेल चालकाला आर्थिक देवाण घेवाण करून पाणी पुरवठा करणाऱ्या व शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

0 टिप्पण्या