श्री संत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था रौप्य महोत्सव निमित्त भव्य किर्तन सोहळा
सर्व भाविक सद् भक्तांना कळविण्यात आनंद होतो कि श्री संत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र फळा ता.पालम जि.परभणी या संस्थेची स्थापना होऊन २५ वर्ष पूर्ण झाल्या कारणाने रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त दि.२७/४/२०२३ रोजी गुरुवार सायंकाळी ३ ते ५ भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे व ५ ते ५:३० संस्थेतील सर्व गुणीजन आजी माजी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे व ठीक ५:३० ते ६ या वेळात शास्त्रीय ताल वाद्य ( पखावज सोलो वादन ) मृदंग अलंकार श्री मुंजाजी मसलेकर व त्यांचे शिष्य श्री गणेशजी कदम श्री उद्धवजी वाळके व कु. विश्वास फळेकर यांचे होईल व ६ ते ८ या वेळेत समाजप्रबोधनकार श्री ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरिकर यांचे कीर्तन होईल.व मृदंग अलंकार मुंजाजी मसलेकर यांना *मृदंग महर्षी* हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे... तरी या रौप्य महोत्सवा प्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील अनेक मान्यवर, माननीय, पूजनीय,वर्णनिय,वंदनीय,आदरणीय,सामाजिक, कार्यकारी, पुढारी, सत्ताधारी, शेतकरी, व्यापारी, शासकीय कर्मचारी, पंचक्रोशीतील सर्व गावकरी गुनिजण असंख्य भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. करीता या रौप्य महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा हि नम्र विनंती.
कार्यक्रमाचे आयोजक
श्री ह.भ.प.गुरुवर्य सदानंदजी महाराज फळेकर (अध्यक्ष फळा संस्था )
मा.श्री गिरधारीलालजी काकाणी ( अध्यक्ष देवस्थान फळा )
मा.श्री कच्रुलालजी बजाज शेठ नांदेड
श्री किशन मोकिंदराव पौळ ( उपाध्यक्ष फळा संस्था )
मृदंग अलंकार श्री मुंजाजी मसलेकर ( सचिव फळा संस्था)
मा.श्री शुभमजी मुंदडा ( डायरेक्टर & C.E.O. गायत्री कंपनी यवतमाळ )
मा.श्री गजाननजी कन्नावर
मा.श्री गजाननजी नारलेवार व वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र फळा विश्वस्त मंडळ तथा गावकरी मंडळी श्री क्षेत्र फळा
*🚩🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩*



0 टिप्पण्या