डहाणूतील आदिवासी समाजावरील अन्याया विरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व समाजबांधव एकवटले...

 डहाणूतील आदिवासी समाजावरील अन्याया विरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व समाजबांधव एकवटले...


मोखाडा प्रतिनिधी - रामदास गाडर 


       बडोदा एक्सप्रेस हायवे प्रकरण संदर्भात दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी धानीवरी तालुका - डहाणू, जिल्हा- पालघर.  येथे आदिवासी समाजावर प्रशासन आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी आज पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेचे आमदार - श्री.सुनील भुसारा प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद श्री.लकीभाऊ जाधव,आमदार श्री.राजेश पाटील आमदार श्री.विनोद निकोले, आमदार  श्री.श्रीनिवास वनगा, माजी खासदार बळीरामजी जाधव,स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने एक वाटले होते.माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सर्व आमदार तसेच सामाजिक संघटना, संस्था प्रतिनिधी, जिल्हा परिषद पालघरचे सदस्य आणि सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या सहयांचे निवेदन देऊन या प्रकरणी दोषी अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य  श्री.काशिनाथ चौधरी, रामदास हरवटे ( पालघर जिल्हा अध्यक्ष - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद)जि.प. सदस्य  श्री.जयेंद्र दुबळा,डॉक्टर सुनील पऱ्हाड,आप - काळुराम काका  दोधडे, ऍड.विराज दादा गडग व सर्व समाजबांधव उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



●●●●●●●●●●●●●●जाहिरात●●●●●●●●●●●●●●●




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या