मोहोने-आंबिवली,येथे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि.१५'फेब्रुवारी ला भव्य महारक्तदान शिबीरचे आयोजन.

 मोहोने-आंबिवली,येथे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि.१५'फेब्रुवारी ला भव्य महारक्तदान शिबीरचे आयोजन.


कल्याण(वार्ताहर प्रतिनिधी)-दि.२७. कल्याण तालुक्यातील मोहोने-आंबिवली या शहरामधे जामनेर,जि.जळगांव येथील जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या कल्याण शाखेच्या  वतीने आणि 'डोंबिवली ब्लड सेंटर,डोंबिवली' या रक्तपेढीच्या सहकार्याने दि.१५/२/२०२५(शनिवार) रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन "संत सेवालाल महाराज मंदिर,मोहने-आंबिवली." येथे करण्यात आले आहे.

      या महारक्तदान शिबीरामधे सर्व समाजबांधव यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले योगदान द्यावे आणि संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

     या महारक्तदान शिबीरामध्ये जे समाजबांधव रक्तदान करतील त्यांना-"आकर्षक-प्रमाणपत्र,रक्तगट कार्ड आणि स्पेशल गिफ्ट" देण्यात येणार आहे.

      या महारक्तदान शिबिरामध्ये ज्या समाजबांधवांना रक्तदान करायचे असेल त्यांनी आपली नावे खालील ठिकाणी नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-मा.अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.


१.कैलासभाऊ तंवर (8286828642)

      (संचालक)

तेजस्वी डायग्नोस्टीक व पॕथॉलॉजी सेंटर,बुद्ध विहार समोर,मोहने-आंबिवली.


२.डॉ.युवराज राठोड(9604080884)

चिरंजीव लहान मुलांचे हॉस्पिटल,बाजार पेठ,मोहने-आंबिवली.



३.रमेशभाऊ राठोड(9702662209)

विराट कलेक्शन & रेडिमेड सेंटर,संत सेवालाल महाराज मंदिर जवळ,मोहोने.

    

     या समाजबांधवांशी संपर्क करुन जास्तीतजास्त रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवावा आणि संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकराव चव्हाण,उपाध्यक्ष-इंदलभाऊ चव्हाण,संचालक-कैलासभाऊ तंवर,विष्णूभाऊ पवार,अजयभाऊ पवार,गणेशभाऊ राठोड,तुकारामभाऊ चव्हाण,गोकुळभाऊ राठोड,सतिषभाऊ राठोड,बळिरामभाऊ राठोड,संचालिका-सौ.अनुसया चव्हाण,श्रीमती.सगुणा चव्हाण,यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या