चेअरमन पदी निवड दिनकरराव राठोड आणी व्हाईस चेअरमन पदी दामू पुंडलिक पाटील यांची निवड..
चाळीसगाव (प्रतिनिधी) दि.०८ एप्रिल रोजी सकाळी ९:०० करगाव विविध कार्यकारी विकास सोसायटी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. व्ही. देशमुख यांच्या उपस्तीथीत माजी विकासो चेअरमन मा. श्री दिनकर धनसिंग राठोड यांची बिनविरोध चेयरमन पदी निवड झाली. व्हाईस चेअरमन दामू पाटील यांची निवड झाली. दिनकर राठोड हे समाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य अहोरात्र करत आहे. गावाला महसूल दर्जा मिळवून देणे असेल ग्रामपंचायत विभाजन असेल तसेच चाळीसगाव तालुक्यातिल विविध गावातील ग्रामपंचायत विभाजन असेल तहसील परिसरात अनेकाचे पगार मंजूर करून देणे रेशनकार्ड करून देणे बांधकाम कामगार यांची नोंदणी करून त्यांना पेटी उपलब्ध करून देणे असेल तसेच चैतन्य तांडा क्र ०४ चे लोकनियुक्त सरपंच पद हे देखील त्याच्या धर्मपत्नी सौ.अनिता दिनकर राठोड सांभाळत आहे. दिनकर भाऊ राठोड हे तालुक्यातील निस्वार्थ समाजिक काम करणारे व्यक्तिमहत्व आहेत त्यांनी आपल्या कार्य कुशलतेच्या जोरावर अनेक नवनवीन उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करत आहे त्याच्या कार्याची दखल घेऊन गावांनी त्याची सर्वानुमते निवड केली आहे दिनकर भाऊ हे बंजारा समाजसाठी पूर्ण वेळ देऊन त्याच्या समस्या सोडविण्याचे काम करत राहतात कोरोना काळात मास्क वापरणे असेल न वापरणारे यांना दंड वसूल असेल गावातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जळसंधारण ची काम असतील अनेक पुरुष महापुरुष यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणे असतील वृक्ष रोपण असेल असे एक नव्हे तर अनेक नव नवीन उपक्रम दिनकर भाऊ राबवत असतात २००९ पासून त्यांचे राजकीय व समाजिक कार्य निरंतर सुरु आहे अश्या ह्या बहुआयमी कार्य करणारे दिनकर भाऊ राठोड यांचे परिसरातून व तालुक्याभरातून कौतुक् व अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्या वर होत आहे.
नमोताई राठोड, पवार सदू , राठोड अलीचंद, राठोड प्रताप,अशोक पाटील,प्रभाकर काळे , भावलाल चव्हाण,विठ्ठल चव्हाण, छबीबाई गोफणे, योगिता पाटील जाधव मधुकर, राठोड कैलास हे संचालक उपस्थित होते. या निवड प्रसंगी सुरेश राठोड, रमेश राठोड,गोरख गोफणे, वसंत राठोड ममराज राठोड,कैलास राठोड उदल पवार ,मधुकरभाऊ राठोड, आनंदा भाऊ राठोड,जयवंत गोफणे, भरत नाना देवरे, बाबुराव मराठे, आत्माराम भाऊ पवार,हजर होते. तर विकासो चे सचिव माणिक पाटील व शिपाई संदीप पवार यांचे सहकार्य लाभले.



0 टिप्पण्या