कांदा पिकाला विना पिक पाणी उतारा सरसकट अनुदान मिळण्यासाठी निवेदन आणि चर्चा..
महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसात नुकसान झालेल्या कांदा पिकाला प्रती क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले, त्या बदल सरकारचे आभार
या अनुदानाचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्यांना होईल ज्यांनी त्यांच्या उताऱ्यावर पिक पांनी मध्ये कांदा पिकाची नोंद ऑनलाईन पद्धतीने केलेली असेल.
पण आजही बरेच शेतकरी हे अशिक्षित आहेत आणि त्यांना या नवीन ऑनलाईन पिक पाणी पद्धतीशी जुळवून घेता येत नाही.
त्यामुळे जवळ जवळ 90% शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नाही, त्या मुळे हे सर्व शेतकरी या अनुदाना पासून वंचित राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही बाब जेव्हा "निर्भय सेवा च्या" कार्यकर्त्यांच्या लक्षात आली, तेव्हा निर्भय सेवाच्या शिष्टमंडळाने स्थानिक तलाठी , तहसील कार्यालय चाळीसगाव, आमदार मंगेश दादा चव्हाण, खासदार उन्मेष दादा पाटील कार्यालय यांच्याशी या विषया वर चर्चा करून निवेदन दिले की, ज्या शेतकऱ्यांकडे कांदा विक्री पावती आहे त्यांना विना पिक पाणी उतारा (कांदा) सरसकट अनुदान मिळवून द्यावे. त्या साठी कराव्या लागणाऱ्या अर्ज प्रक्रियेत् मदत करावी आणि हे अनुदान लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळून द्यावे.
जो पर्यंत हे सर्व साध्य होत नाही तोपर्यंत निर्भय सेवा आणि त्याचे सर्व सहकारी पाठपुरावा करत राहतील आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदान मिळवून देतील.
या वेळी निर्भय सेवा चे अध्यक्ष संजय ममतू राठोड, सचिव संजय बाबुलाल राठोड आणि सहकारी अंकुश म. राठोड, दिनेश राठोड, अमोल(बबलू) राठोड, ज्ञानेश्वर राठोड, लक्ष्मण रामदास राठोड (मा. सरपंच), नंदू भिऊ राठोड आणि ईश्वर जाधव उपस्थित होते.



0 टिप्पण्या