खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते धुळे दादर एक्सप्रेसचा शुभारंभ
स्वातंत्र्यानंतर धुळे येथून मुंबईसाठी पहिल्यांदा स्वतंत्र नविन एक्सप्रेस गाडी होणारं सुरु
खासदारांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मुंबई कडे होणारं रवाना
खान्देशात जल्लोष
मुंबई जाण्यासाठी एकमेव गाडी असल्याने तातडीने मिळतील रिझर्व्हेशन तिकीट
चाळीसगाव - स्वातंत्र्यानंतर प्रथमच थेट धुळे येथून मुंबई जाण्यासाठी एकमेव गाडी सूरू झाल्याने खान्देशातील प्रवाश्यांना मोठी सोय होणार असून यापूर्वी दादर अमृतसर एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेसला धुळे साठी बोग्या आरक्षित करून जोडल्या जात होत्या. आता ही अडचण दुर होणार आहे. स्वतंत्र नविन गाडी सूरू झाल्याने खान्देशातील प्रवाश्यांना झटपट आरक्षण उपलब्ध होऊन दळणवळणास चालना मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली आहे.
आज रेल्वे विभागाच्या वतीने धुळे मुंबई एक्सप्रेस गाडी शनिवार दि.29 तारखेपासून सुरू होणार असून त्याला खासदार उन्मेशदादा पाटील हिरवी झेंडी दाखवणार असल्याचे माहिती देण्यात आली. 20 एप्रिल रोजी ही नविन गाडी सूरू करण्याबाबत रेल्वेने निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यामुळे ही गाडी कधी सुरु होणार याची उत्सुकता वाढली होती.
शनीवारी चाळीसगाव येथे जल्लोषात होणारं स्वागत
सद्यस्थितीत रेल्वे विभागाने नविन योजनाच्या माध्यमातुन रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरण, आधुनिकीकरण साठी कंबर कसली आहे. राज्यात अमृत भारत योजनेअंतर्गत जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव, अमळनेर व धरणागव या रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे. चाळीसगाव येथे भव्य दिव्य रेल्वे ओव्हर ब्रीज पुर्ण झाला असून त्याची पाहणी देखील खासदार उन्मेशदादा पाटील हे करणार आहेत. यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने प्रवाश्यांनी उपस्थीत राहवे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रवाशांचे स्वागत करुन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी नेतृत्वातील केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले जाणार असून उपस्थितीचे आवाहन डी आर यू सी सी सदस्य के.बी.दादा साळुंखे यांनी केले आहे.
आज सायंकाळी भारत गौरव ट्रेनचे खासदारांच्या हस्ते स्वागत
रेल्वे मंत्री नामदार रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते पुणे येथून पर्यटन विकासासाठी विविध वैशिष्टे असलेली लोकप्रिय ठरलेली भारत गौरव ट्रेन सुरु होणार असून या गाडीला नाशिक मनमाड चाळीसगाव व भुसावळ असे थांबे देण्यात आले असून सायंकाळी खासदार उन्मेशदादा पाटील यांचे हस्ते गाडीतील प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे.



0 टिप्पण्या