सामूहिक श्रद्धांजली" : हिरापूर रोड परिसरातील अपघातग्रस्त तरुणास सामूहिक श्रद्धांजली

 "सामूहिक श्रद्धांजली"

सर्व हिरापूर रोड रहिवासी नागरिकांना कळविण्यात येते की,दि. ०६/०३/२०२३ रोजी परशुराम गुरुजी नगर हिरापूर रोड वरील सर्वांचा लाडका मनमिळाऊ तसेच परिवारातील एकुलता एक असा कष्टाळू मुलगा कै.शुभम (सनी) जोमदे यांचे आकस्मात निधन झाले. शुभम (सनी) हा स्वभावाने खूपच चांगला होतकरू मुलगा होता, तसेच सर्वांशी हा हसून-खेळून वागत असल्यामुळे त्याची पूर्ण हिरापूर रोड परिसरातील नागरिकांची एक प्रकारची प्रेमाची नाळच जोडली गेली होती शुभम (सनी) हा जातीने गवळी समाजाचा असला तरी, त्याचे व्यवहारीक संबंध तसेच मित्रप्रेम संबंध इतर जातीच्या नागरिकांशी इतक्या मोठ्या प्रमाणात होते की ते शब्दशः वर्णन करू शकत नाही.

आज न घडो..

 असे घडून गेले..!

 आपल्यातून अचानक शुभम (सनी) हा सर्वांना फक्त आठवणी देऊन कायमचा निघून गेला आपण सर्वांनी कितीही केलं तरी त्याची भर निघून येणार नाही.*

 मित्र असावा..

   तर कसा..?

 हे त्यांनी खूपच कमी वयात सर्वांना अनुभवून दिलं शुभम (सनी) च्या अशा अचानक जाण्यामुळे त्याच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला ते पेलवण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो.. व शुभम (सनी) यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

 म्हणून  दि. ०७/०३/२०२३ रोजी संध्याकाळी ०७ वाजता ओम शांती ट्रेडर्स जवळ हिरापूर रोड चाळीसगाव येथे "सामूहिक श्रद्धांजली" ठेवली आहे तरी सर्व मित्र परिवार व हिरापूर रोड परिसर नागरिकांनी "सामूहिक श्रद्धांजली" वहिन्यात  आली


      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या