चाळीसगावला कायदेविषयक जनजागृतीतून महिलांचे सक्षमीकरण' निमित्त शिबीर संपन्न.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व राष्ट्रीय महिला आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तसेच तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने 'कायदेविषयक जनजागृतीतून महिलांचे सक्षमीकरण' निमित्त शिबीर संपन्न.



माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व राष्ट्रीय महिला आयोग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि. १०/०३/२०२३ रोजी विठ्ठल रुख्माई मंदिराचे आवारात, ओझर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथे 'कायदेविषयक जनजागृतीतून महिलांचे सक्षमीकरण' निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव, वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने मा.अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली महाशिबीर घेण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात नालसा गाण्याने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम सावित्रीबाई फुले व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. अॅड. कविता डब्ल्यु. जाधव, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन केले. सदर शिबीरात अॅड. एन.एम.लोडाया खजिनदार तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी 'लग्न आणि घटस्फोट कायदा', 'महिलांना संपत्तीचा अधिकार', 'कौटुंबिक हिंसाचार', 'गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा', 'वैद्यकीय गर्भपात कायदा' या विषयांवर मार्गदर्शन केले. अॅड.श्री.रविंद्र लांडगे, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी 'कामगार कायदा', 'कारखाने कायदा', 'प्रसुती विषयक लाभ अधिनियम' या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड.सुलभा शेळके, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी 'हुंडा बळी' , 'अॅसीड हल्ला', 'अपहरण', 'बलात्कार आणि लैंगिक अत्याचार', 'पॉक्सो कायदा' या विषयांवर मार्गदर्शन केले. अॅड. श्री. लव हरी राठोड सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी 'कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारापासून महिलांचे संरक्षण', 'समान वेतन कायदा व महिलांचे पुनरात्पादक आरोग्याचे अधिकार' या विषयांवर मार्गदर्शन केले. मा.अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी अध्यक्षीय भाषणात तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव मार्फत महिलांना मोफत विधी सहाय्य तरतुदीबाबत माहिती देवून महिला सबलीकरणाच्या उद्देश सखोल अशी चर्चा करुन उपस्थित असलेल्या महिलांच्या अनेक प्रश्नांचे समाधान केले. अशाप्रकारे प्रश्नाेत्तरे व चर्चेच्या माध्यमातून अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. उपस्थित महिलांसाेबत संवाद साधून त्यांनी विचारलेल्या शंकाचे निरासन केले तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला संबंधी कायद्यातील महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकून महिलांची सक्षमीकरण करुन देशाच्या विकासात कसा हातभार लावू शकतात याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास आेझर गावाचे ग्रामसेवक श्रीमती.सुनिता युवराज चौधरी, सौ. शितल रोहीदास पाटील (पोलीस पाटील) तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार, श्री. डी.टी. कु-हाडे व श्री. किशोर पाटील यांनी पाहिले. तसेच सदर कार्यक्रम भव्यदिव्य व यशस्वी करणेकरिता ओझर येथील आशासेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री.के.एन.माळी, सहा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगाव यांनी सर्व प्रमुख अतिथी, मान्यवर व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या