अमेरिकन मुलगी 12वी पास भारतीय मुलाच्या प्रेमात पडली, अमेरिका सोडून भारतात आली आणि लग्न केले!


मोबाईल मुळे जग खूप जवळ आले आहे. जगातील कोणत्याही ठिकाणी आता सहज तुम्ही संपर्क साधू शकता. आणि याच संपर्कातून व्यक्तीचे सात जन्माचे देखील नाते जोडले जाऊ शकते. होय, एक अमेरिकन मुलगी भारतीय मुलीच्या प्रेमात पडली आणि तिने लग्न केले.

आम्ही बोलत आहोत दीपक कौशिक बद्दल जो हरियाणातील कादीपूर या गावातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. 12वी उत्तीर्ण असलेल्या दीपकने यूएसएच्या शेली मारिनला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. जून 2015 मध्येच दोघांची मैत्री झाली आणि गप्पा सुरू झाल्या. हळूहळू दीपक शेलीच्या प्रेमात पडला.

जानेवारीमध्ये दीपकने शेलीला लग्नासाठी प्र’पो’ज केले आणि ती “हो” म्हणेल अशी त्याला कधीच अपेक्षा नव्हती. आणि त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध, तिने लग्नाला सहमती दर्शवली. 44 वर्षीय शेली न्यूयॉर्कची असून तिचे वडील चित्रकार आहेत.

शेलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या कुटुंबाला या लग्नात कोणतीही अडचण नाही आणि म्हणूनच ती नोकरी सोडून दीपकसोबत लग्न करण्यासाठी भारतात आली. कनॉट प्लेसच्या आर्य समाज मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार या जोडप्याचा विवाह झाला.

या लग्नामुळे दीपकचे कुटुंब तसेच त्याच्या गावातील इतर लोक खूप आनंदी आहेत. शेली हिंदीत कसे बोलावे आणि भारतीय जेवण कसे बनवायचे हे शिकत आहे. सध्या ती टुरिस्ट व्हिसावर भारतात राहत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या