12 चौकार, ३ जबरदस्त षटकार… सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरने रणजी करंडक पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास, पहिल्याच सामन्यात शतक ठोकत मोडले हे विक्रम..
क्रिकेटविश्वात देव म्हटल्या जाणार्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी करंडक पदार्पणातच इतिहास रचला आहे. गोव्याकडून खेळत असलेल्या अर्जुनने वडिलांचा विक्रम मोडला आणि पहिल्याच सामन्यात राजस्थानविरुद्ध १७८ चेंडूत शतक झळकावले. त्याच्या या धडाकेबाज खेळीत 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. याचबरोबर अर्जुन तेंडुलकरच्या या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावले.
भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजी नव्हे तर फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. या खेळीच्या जोरावर त्याने वडील सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. कारण सचिनने हा पराक्रम 1988 मध्ये गुजरातविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात केला होता.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोवा संघाकडून फलंदाजीची संधी मिळाली नाही, मात्र त्याने या रणजी ट्रॉफी हंगामात फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही दणका दिला आहे. त्याच्या या खेळीनंतर चाहते सोशल मीडियावर ट्विट करून आपापल्या शैलीत प्रतिक्रिया देत आहेत.
0 टिप्पण्या