टाकळी प्रचा ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकाचा कोट्यावधी रुपयांचा अपहार
10 महिन्यापासून मासिक सभेचे प्रोसेडींग लिहिलेच नाही
जळगाव जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायत पैकी टाकळी प्रचा ग्रामपंचायत जिल्ह्यात मोठी ग्रामपंचायत आहे. परंतु जवळपास मे 2022 पासून तर आजपर्यंत ग्रामपंचायत जमा खर्चाचा हिशोबाचा काही अता पता याठिकाणी दिसून येत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य भावेश कोठावदे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. विस्तृत तक्रार अशी कि, 28/05/2022 रोजी झालेल्या मासिक मिटिंग पासून ते आज पर्यंत झालेल्या 10 मिटिंगचे प्रोसेडींग बुकवर काहीच आढळून येत नसून प्रोसेडींग बुक ची पाने कोरी सोडण्यात आलेली असून एकही मिटिंग क्लोज केलेली नाहीये. सदर बाब ही गंभीर स्वरूपाची असून जर जमा खर्चास सभागृहाने मंजुरी दिलीच नाही तर आज वर हा खर्च परस्पर कसा मंजूर करण्यात आला.?
28/5/22 ते 28/02/22 या 10 महिन्यात 2 मिटिंग झाल्याच नाहीत तर त्या प्रोसेडींग वर घेतल्याच कशा हे देखील शोधणे महत्वाचे असून कोट्यावधी रुपयाची उलाढाल असणाऱ्या टाकळी प्रचा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने मोठा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य भावेश कोठावदे यांनी केलेला आहे.
0 टिप्पण्या