महसूल विभागाची अवैध रेती ट्रकवर मोठी कारवाई

 महसूल विभागाची अवैध रेती ट्रकवर मोठी कारवाई


राळेगाव तालुका प्रतिनिधी -विलास साखरकर(8208260998) 


चंद्रपूर  जिल्ह्यातून बांबर्डा नदी घाटातून  रेती घेऊन येत यवतमाळ कडे जात असलेले तीन ट्रक राळेगाव येथे  रामतीर्थ पॉईंट वर तलाठी कणसे यांनी रेतीच्या ट्रकची तपासणी  केली असता रायल्टीच्या क्षमतेपेक्षा रेती जास्त  आढळून आल्याने तीनही ट्रकचा पंचनामा करून ट्रक तहसील कार्यलयात लावण्यात  आले आहे.

घाटावरून रेतीची वाहतूक करण्याची मर्यादा ही दोन ब्रास असतांना ट्रक क्रमांक  एम एच  २९ बी सि ००१९ वाहन मालक नरेंद्र पाटील  व ट्रक क्रमांक एम एच २९ सी २६ ४१  साई कंट्रक्शन बोरगाव तर ट्रक क्रमांक एम एच  २९ टी १३७२  कान्होबा कन्ट्रक्शन यांच्या मालकीचे असून या तीनही ट्रकची तपासणी महसूल विभागाचे तलाठी कणसे यांनी केली असता या तीनही ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा एक ब्रास रेती जास्त आढळून आल्याने एक ब्रास अवैध  रेतीचा जप्ती-नामा करण्यात आला असून ट्रक  राळेगांव तहसील कार्यालयात लावण्यात असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या