मंत्री व्हायचंय ज्याला, राळेगाव मतदार संघाकडे चला
( विधानसभा इच्छुकांच्या भेटीगाठी व दौऱ्याने राजकीय वर्तुळात हलचल )
राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर
राळेगाव शांततेच्या काळात अधिक घाम गाळला कि युद्धात कमी रक्त सांडत, असं म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात जि. प
व प. स, सहकार क्षेत्रातील कृ. उ. बा. स. च्या लांबत चाललेल्या निवडणुका पाहू जाता तसा राजकीय दृष्टी ने हा शांततेचा काळ.मात्र विधानसभा तयारीला लागण्याची ही महत्वाची वेळ. नव्याने मैदानात येऊ पाहणाऱ्या भिडू करीता तर आता पासून कामी लागणे महत्त्वाचेच. राळेगाव विधानसभा मतदार संघात या निकषावर दोन इच्छुक उमेदवार ऍक्टिव्ह झाले आहे. नरेश पोयाम व रमेश कन्नाके ही त्यांची नावे. भेटीगाठी, साडी वाटप आदी फ़ंडे चांगलेच फार्मात असून या मुळे नाही म्हणायला राजकीय वर्तुळात हलचल निर्माण झाली आहे.
राळेगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा व काँग्रेस या विरोधी विचारधारा असणाऱ्यां पक्षातील नेत्यांच्या राजकीय प्रवासात मात्र कमालीची साम्यस्थळे दिसतात. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतुन आलेले, राजकीय वारसा नसणारे प्रा. वसंत पुरके राळेगाव विधानसभा मतदार संघातून आमदार झाले. त्या नंतर शालेय शिक्षण मंत्री झाले. विधानसभेच्या उपाध्यक्षपदावर त्यांचे नाव कोरल्या गेलें. आजही काँग्रेस च्या जिल्हास्तरीय नेत्यांत त्यांचे महत्व कायम आहे. प्रा. डॉ. अशोक उईके यांचा देखील राजकीय प्रवास नाही रे गटातून सुरु होऊन विस्तारत गेला तो थेट आदिवासी विकास मंत्री या पदापर्यंत. दोन्ही नेत्यांची केबिनेट पदावर वर्णी लागली. आमदार झाले सत्ता आली कि मंत्री पदाचे जुगाड येथे जमते असा इथला इतिहास असल्याने अनेकांना हा मतदार संघ आपल्याकडे आकर्षित करून घेतो. या वेळी दोन मात्तबर नेते गाठी -भेटी, साड्या वाटप आदी उपक्रमातुन जवळीक साधण्याला प्राधान्य देतं असल्याचे निदर्शनास येतं आहे.
यात एक आहेत रमेश कन्नाके हे तसे एका अर्थाने जुने खेळाडू पण आता पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरु पाहात आहे. कन्नाके यांनी राळेगाव, कळब, बाभुळगाव या तिनही तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांच्या, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील महत्वाच्या भेटीगाठीचा दौरा पूर्ण केला. त्या वेळी प्रत्येकाला या वेळी माझी उमेदवारी कायम असल्याची खात्री त्यांनी अनेकांना दिली. मतदार संघात साडी वाटप करण्याची टूम यांचीच असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे नरेश पोयाम हे देखील मतदार संघात ऍक्टिव्ह झाले आहे. उच्च विद्याविभूषित, आर्थिक सपंन्न व प्रशासनातील जिल्हाधिकारी सारख्या उच्च पदावर कार्य केल्याचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांचे राळेगाव चे दौरे सुरु झाले आहे. महत्वाच्या व्यक्ती च्या भेटी घेऊन त्यांच्या समोर आपली भूमिका मांडण्याला त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसते.
पोयाम व किन्नाके राळेगाव मतदार संघात सक्रिय होतं असतांना एक विशेष बाब लक्षात घ्यावी लागेल ती ही कि दोन्ही इच्छुकांना मात्तबर पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री आहे.
या पार्श्व्भूमीवर मतदार संघाची राजकीय स्थिती लक्षात घ्यावी लागेल. काँग्रेस मध्ये जो पर्यंत प्रा. वसंत पुरके दुसऱ्या कुणाला उमेदवारी दया असे स्वतः म्हणतं नाही तो पर्यंत या मतदार संघात काँग्रेस चा दुसरा कुणी उमेदवार राहू शकतं नाही अशी वदंता आहे. मतदार संघात त्या तोडीचा दुसरा उमेदवार देखील काँग्रेस जवळ नाही. उमेदवार आयात केल्यासच काय तो तिढा सुटेल. अर्थात प्रा. वसंत पुरके यांचे शिवाय आज तरी ती शक्यता नाहीच. भाजपा अंतर्गत प्रा. डॉ. अशोक उईके हे मतदार संघातील भाजपाचे महत्वाचे चलनी नाणे, त्यातही देवेंद्र फडणवीस यांचे गुड बुक मध्ये यांचा समावेश. आताही मंत्री मंडळ विस्ताराची चर्चा होते त्यात यांचे नाव स्पर्धेत असतेच असते. कारणं नसतांना यांना डचू देऊन भाजपा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल. नगर पंचायत चा पराभव या कंड्या पिकवण्यात येतं असल्या तरी त्यात दम नाही. त्या निकषावर प्रा. अशोक उईके यांची तिकीट कटणार असे भाकीत म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने या पेक्षा अधिक काही नाही. याचा अर्थ काँग्रेस व भाजपा मध्ये प्रस्थापित उमेदवार कायम राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग उरतात राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गट व बाळासाहेबांची शिवसेना सिंदे गट आणि मनसे हे पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्या पक्षाची कुणासोबत युती होणार याचा अदमास नाही मात्र इच्छुकांनी आपला इरादा स्पष्ट केला. पक्ष त्यांनी सांगितलेला नाही. काही गणित वेळेवर सोडवू अशी सूचक प्रतिक्रिया यातील एका ने दिली. प्रा. वसंत पुरके प्रा. डॉ. अशोक उईके, नरेश पोयाम, रमेश किनाक्के ही महत्वाची नाव या व्यतिरिक्त किमान अर्धा डझन उमेदवार मतदार संघात कामी लागल्याची माहिती आहे. या मुळे शांत - शांत झालेल्या राजकीय वर्तुळात काही तरंग निर्माण झालेले दिसतात. पुढे याच्या लाटा होतील कि हे पेल्यातील वादळं ठरेल याचे उत्तर काळ देईल.
थेट कॅबिनेट मंत्री पदावर नेऊन बसवणाऱ्या मतदार संघाचे आकर्षण
अनु. जमाती करीता राखीव असणारा मतदार संघ एव्हडीच मर्यादित ओळख राळेगाव विधानसभा मतदार संघाची नाही. इथून आमदार म्हणून निवडून आले व प्रतिनिधित्व करणार्यां पक्षाची सत्ता आली कि इथला आमदार थेट कॅबिनेट मंत्री होतो. हा इतिहास अनेकांना आकर्षित करतो. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके विद्यमान आमदार व माजी मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके हे यातील अलीकडचे उदाहरण. या मुळे राज्यातील राजकीय महत्वाकांक्षा असणारे वरिष्ठ अधिकारी, धनदांडगे राळेगाव विधानसभा मतदार संघावर नजरा ठेऊन असतात. आयुष्याच चांगभल करुन घेण्याचा मार्ग त्यांना राळेगाव कडे घेऊन येतो. आता ही दोन मात्तबर नेते याच कारणाने राळेगाव कडे आकर्षित झाले आहे. भाजपा बद्दलची नाराजी व काँग्रेस मधील पराभूत मानसिकता यातच बदललेली राजलीय परिस्थिती याचा लाभ उचलण्याची संधी त्यांना या वेळी दिसते. महाविकास आघाडी ची युती होते कि नाही ही अनिश्चितता आहेच मात्र आपले घोडे दामटवायचेच या साठी अनेकांनी कंबर कसल्याचे चित्र निदर्शनास येते . दोन जणांनी प्रत्यक्ष सुरुवात केली आहे पण इच्छुकांची संख्या अर्धा डझन असल्याची आकडेवारी विदर्भ मतदार कडे आहे.
0 टिप्पण्या