बंजारा समाज देवाची भव्य यात्रेचे आयोजन
प्रतिनिधी योगेश जाधव कळमनुरी
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कळमनुरी येथील बंजारा समाजाचे आराध्य दैवत लमान देव रामचंद्र सात महाराज व जगदंबा देवी मंदिर परिसरात भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .दिनांक 23 फेब्रुवारी रोजी या यात्रेला सुरुवात होणार आहे .दिनांक 23 फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री रामचंद्र सात महाराज यांच्या पालखीचे आयोजन तसेच भव्य मिरवणुकी गावांमधून काढण्यात येणार आहे. या पालखीमध्ये श्री दशरथ महाराज वरंधळीकर भजनी मंडळ व इतर भजनी मंडळ तसेच मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव हे उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त समाज बांधवांनी या पालखी सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन लमान देव मंदिर समितीतर्फे करण्यात येत आहे. तसेच पालखीची मिरवणूक झाल्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. या यात्रेला भव्य बनवण्यासाठी श्री कुंदन महाराज मुख्य विश्वस्त व प्रमुख पुजारी लमानदेव मंदिर कळमनुरी तसेच पांडुरंग रामधन राठोड मंदिर समिती सचिव विश्वस्त मंडळ कोषाध्यक्ष बाबुसिंग पाटील सुभाष राठोड आणि लाडे गोवर्धन राठोड यांनी समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या