धानोरा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यंस्मरण महोत्सव थाटात साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यस्मरण महोत्सव दि. 29, 30 /2023 जानेवारी ला थाटात साजरा करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे सामुदायीक ध्यान,ग्रामसफाई,रामधुन,सामुदायिक ,प्रार्थना, व दि .29 -1-2023 ला संध्याकाळी ह.भ.प्र. श्री नामदेवराव वाढई महाराज ( रिधोरा ) व संच यांचं किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता .त्याच प्रमाणे 30 -1-2023 ला सामुदायीक प्रार्थना ,ग्रामसफाई,व धानोरा येथील बाल गुरूदेव सेवा मंडळ यांचे भजन व गावातील सपुर्ण भजन मंडळी यांनी गावातुन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रभात फेरी काढण्यात आली व त्यांनंतर काला करण्यात आला महत्वाचे म्हणजे दहावी मध्ये व बारावी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शांताबाई फटींग व हिरामंजी फटींग यांच्या स्मृती प्रित्यर्थ गणेशराव फटिंग यांच्या कडुन स्मृती चिन्ह व ग्रामगीता देण्यात आली .यावेळी धानोरा येथील प्रथम नागरीक दिक्षाताई प्रवीण मुन ,भारतीय सेनेत असलेले अनिकेत उराडे,व वृषभ कामडी यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले,बारावीत प्रथम आलेली पुज्या दिनेश चाहाकाटे,व दहावीत प्रथम आलेली वैष्णवी प्रदिप गुजरकर ,पुर्वा रामुजी भोयर,वैष्णवी दिलीप गलाट यांचे स्वागत करण्यात आले,त्याचप्रमाणे धानोरा जिल्हा परीषद शाळेतील मुलांना गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते ,या कार्यक्रमाला गुरूदेव सेवा मंडळातील सर्व सदस्य व गावातील जनतेनी सहकार्य केले
जाहिरात
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
✒️ जनसेवा पत्रकार संघ ✒️
या पत्रकार संघटनेत संपूर्ण महाराष्ट्रात पदाधिकारी नेमणूक सुरु आहे ईच्छुकांनी संपर्क करावा. मो.7208100427 / 9881299770
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
1 टिप्पण्या
Hu
उत्तर द्याहटवा