पत्रकारां ला अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी

पत्रकारां ला अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी 

राळेगांव तालुका पत्रकार संघाचे निषेध तक्रार  निवेदन प्रशासनास दिले


राळेगाव तालुका प्रतिनिधि विलास साखरकर                                                                           

कळंब तालुका प्रतिनिधी शेषेराव मोरे 

यांनी आजच्या अंकात नगरपंचायती च्या विरोधात बातमी प्रकाशित केली,

त्यामुळे नगराध्यक्षांचे चिरंजीव सरोश उर्फ सोनू सिद्दीकी याने चिडून पत्रकार शेषेराव मोरे यांना अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी व मोटारसायकल अंगावर घातली.

हा प्रकार अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे याचा तीव्र निषेध,स्व.पी.एल.शिरसाट प्रणित यवतमाळ जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ   शाखा राळेगांव तालुका पत्रकार संघाचे वतीने विशेष सभेत करण्यात आला आहे.

दोषी वर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा प्रकार पुन्हा होऊ 

याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा आशयाची लेखी तक्रार आज दी. 30/01/2023 रोज सोंवरला तहसिलदार डाँक्टर रविंद्र कानडजे यांना व पोलिस स्टेशन राळेगांव चे पोलिस निरीक्षक संजय चौबे यांना देण्यात आले आहे.  यावेळी राळेगांव पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश शेंडे,सचिव राष्ट्रपाल भोंगाडे,उपाध्यक्ष रामू भोयर,मनोहर बोभाटे सह प्रकाश मेहता,राजेश काळे,मोहन देशमुख, फिरोझ लाखाणी, प्रमोद गवारकर,मंगेश राऊत, महेश भोयर,गुड्डू मेहता, शंकर वरघट, विनोद चिरडे, विशाल मासूरकर,संजय दुरबुडे,दीपक पवार,गजानन ठूणे,अरविंद तेलंगे,  रणजित परचाके, दीपक वरटकर, सह अन्य सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या