उमेदच्या क्षमता बांधणी अधिकाऱ्यांनी केली महिलेची फसवणूक संबंधितांकडे लेखी तक्रार दाखल
मला न्याय न मिळाल्यास मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रकल्प कार्यालय राळेगाव यांच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. रेश्मा श्रीरामजी कापटे धानोरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर 8208260998
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण करण्यासाठी जिल्ह्यात बऱ्याच गावांमध्ये महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाने हे उपक्रम राबविले आहे परंतु उमेद चे काही अधिकारी हे कागदपत्रे महिला सक्षमीकरण झाले असे सांगून महिन्याला लाखो रुपयांचा पगार घेऊन शासनाची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे सदर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राळेगाव येथिल कार्यरत असलेले क्षमता बांधणी अधिकारी म्हणून राजेंद्र कुरफुडे यांनी राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील रेश्मा श्रीरामजी कापटे ईला आयसी आरपी म्हणून काम करण्याकरिता सांगितले होते सदर आपले अधिकारी म्हणून राजेंद्र खुरपुडे यांच्या सांगण्यावरून रेश्मा श्रीरामजी कापटे या महिलेने २०२० ते २०२२ या २८ महीण्याच्या कालावधी करिता मौजा धानोरा ता. राळेगाव येथे आयसी आरपी म्हणून नेमणूक करुन तीचे कडून काम करुन घेतले आहे.सदर या महिलेचे शिक्षण बी.कॉम. पर्यंत झालेले असुन ही महिला सुशिक्षित बेरोजगार तरुणी आहे. सदर रेश्मा श्रीरामजी कापटे यांच्या आधी मौजा धानोरा गावात येथील आयसी आरपी म्हणून पुर्वी वंदना मेघश्याम येलके ही महिला काम करीत होती परंतु तीचा सन २०२० मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे धानोरा या गावाकरीता आयसी आरपीची गरज होती.त्यामुळे राजेंद्र कुरफुडे तालुका क्षमता बांधणी अधिकारी प.स. राळेगाव यांनी धानोरा या गावात जाऊन रेश्मा श्रीरामजी कापटे यांच्याशी संपर्क साधून सदर तु धानोरा गावाकरीता आयसी आरपी म्हणून काम कर व त्याचा तुला मोबदला आपल्या कार्यालयाकडून प्रति महीण्याला २ ते ३ हजार रुपये याप्रमाणे देईल असे त्यांनी रेश्माला सांगितले होते. त्यावरुन मार्च २०२० ते जुन २०२२ या २८ महीण्याच्या कालावधी करिता मौजा धानोरा या गावाकरीता आयसी आरपी म्हणून रेश्मा श्रीरामजी कापटे ही कार्य करीत होती. सदर कार्य करुन त्याद्वारे तीला दिलेली जबाबदारी पार पाडत गावातील जवळपास १७ बचत गटातील महिलांना विविध प्रकारे मार्गदर्शन करुन सोपविलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होती. त्यानंतर रेश्मा श्रीरामजी कापटे हीचा विवाह झाला व तीला पतीगृही जाणे भाग पडले.नंतर तीच्या पूर्वी आयसी आरपी म्हणून असलेली महिला पुर्ववत तीचे कामावर रुजू झाली.असल्याने त्यामुळे जून २०२२ पासून रेश्मा श्रीरामजी कापटे यांचे काम बंद झाले.त्यानंतर रेश्मा कापटे यांनी क्षमता बांधणी अधिकारी राजेंद्र कुरफुडे यांना प्रत्यक्ष व त्यांचे कार्यालयाशी संपर्क साधून मी दिलेल्या २८ महीण्याच्या सेवेपोटीचा मोबदला मला अदा करावा अशी वेळोवेळी कापटे यांनी विनंती केली होती.परंतु त्यांनी असे सांगितले होते की मी लवकरच तुमचे काम करतो असे सांगून आजपर्यंत रेश्मा श्रीरामजी कापटे यांना मानधनाची रक्कम देण्याचे टाळाटाळ केलेली आहे. तसेच ते क्षमता बांधणी अधिकारी राजेंद्र कुरफुडे रेश्मा श्रीरामजी कापटे यांना भेटणे सुध्दा टाळत आहे.सदर रेश्मा श्रीरामजी कापटे ही एक सुशिक्षित तरूणी असुन ईच्या कडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही.सदर २८ महीण्याच्या कालावधीत केलेल्या कार्याचा लेखाजोखा दस्त ऐवजाद्वारे रेश्मा श्रीरामजी कापटे यांनी क्षमता बांधणी अधिकारी राजेंद्र कुरफुडे यांच्या कडे सोपविलेला आहे.तसेच धानोरा येथील बचत गटातील महिलांनी देखील रेश्मा श्रीरामजी कापटे यांनी २८ महिने उपरोक्त कालावधीत कार्य केले आहे.या बाबतचा ठराव सुध्दा. सदर महिलांनी सहीशिक्यानिशी दिलेला आहे.परंतु तालुका क्षमता बांधणी अधिकारी राजेंद्र कुरफुडे यांनी जून २०२२ या २८ महीण्याच्या कालावधीकरिता आयसी आरपी म्हणून नेमणूक करुन या महिलेकडून काम करुन घेतले. आहे. सदर २८ महिने केलेल्या कामाची रक्कम मिळण्याबाबत तसेच क्षमता बांधणी अधिकारी राजेंद्र कुरफुडे यांच्या वर कार्यवाही करण्याबाबत.सदर २८ महिने केलेल्या कामाची रक्कम न मिळाल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन रेश्मा श्रीरामजी कापटे यांनी डॉ हेमंत वसेकर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापक कक्ष मुंबई,मा. जिल्हा अधिकारी यवतमाळ,मा. निरंजन नखाते, जिल्हा व्यवस्थापक उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यवतमाळ,मा. मिलिंद चोपडे, तालुका व्यवस्थापक राळेगाव, मा.केशव पवार गटविकास अधिकारी राळेगाव यांना दिले आहे
0 टिप्पण्या