मुंबई गटाध्यक्ष मेळावा मनसे अध्यक्ष.राजसाहेबांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 मुंबई गटाध्यक्ष मेळावा मनसे अध्यक्ष.राजसाहेबांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे  


🔸• आमचं रेल्वे भरती आंदोलन हे कोणत्याही राज्याविरुद्ध नव्हतं तर आमच्या हक्काच्या नोकऱ्या हिसकावू पाहणाऱ्या आणि परराज्यातून येणाऱ्या लोंढ्याविरुद्ध होतं...


🔹• पक्षाचे नेते जाब विचारायला गेले आणि आम्हाला आई-बहिणीवरून शिवीगाळ सुरु झाली म्हणून आंदोलन पेटलं...पण जे रेल्वे भरती आंदोलन केलं,त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो मुलांना नोकऱ्या मिळाल्या...ज्या राज्यात नोकऱ्या उपलब्ध होतील, तिथल्या स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळालंच पाहिजे... 


🔸• महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनधिकृत टोल विरुद्ध आंदोलनामुळे ६५ ते ६७ टोलनाके बंद झाले...कायद्याप्रमाणे दुकानांवर मराठी पाट्या असायला हवेत ह्यासाठी लढली महाराष्ट्र नवनिर्माण सेना...


🔹• आझाद मैदानावर रझा अकादमीच्या मोर्चात महिला पोलीस भगिनींचा विनयभंग करण्यात आला, वृत्त माध्यमांच्या गाड्यांना आगी लावण्यात त्यांना जरब ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्च्यामुळे बसली...पण त्यावेळेला इतर पक्ष गप्प का बसले होते? हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करणारी शिवसेना कुठे होती तेंव्हा ?


🔸• पाकिस्तान कलावंतांना भारतीय सिनेसृष्टीतून हाकलले कुणी? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने,तेव्हा हिंदुत्ववादी कुठे होते? 


🔹• महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इतकी आंदोलन यशस्वी करून दाखवली तरी प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच विचारले जातात...म्हणूनच गेल्या १६ वर्षांतल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यशस्वी आंदोलनांची पुस्तिका काढणार...


🔸• मशिदींवरचे भोंगे निघाले पाहिजेत अशी स्व.बाळासाहेबांची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली...मस्जिदींवरच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावली भोंगे आपोआप खाली उतरले...


🔹• अजून सगळे भोंगे उतरले नाहीयेत, अजून काहींची चरबी उतरली नाहीये...त्यामुळे पहिल्यांदा पोलिसात तक्रार करा...पोलिसांनीही लक्षात ठेवावं की, जर तुम्ही कारवाई केली नाहीत तर तुमच्यावर कोर्टाचा अवमानाचा गुन्हा दाखल होईल...तरीही भोंगे बंद नाही झाले तर मात्र मशिदीसमोर हनुमान चालिसा लावाच...


🔸• महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प बाहेर जात आहेत...मला प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्याच वाईट नाही वाटत आहे, ते एखाद्या मागासलेल्या राज्यात गेला असता तरी हरकत नव्हती...देशातील प्रत्येक राज्य प्रगत होऊ दे, पण मोदींनी फक्त गुजरात गुजरात करू नये ही अपेक्षा आहे...


🔹• महाराष्ट्रातून इतके उद्योग गुजरातला जात आहेत, ह्यावर धोतर (राज्यपाल कोशियारी) का नाही बोलले? गुजराती आणि मारवाडी महाराष्ट्रातून गेले तर महाराष्ट्राचं काय होईल, असं कोशियारी म्हणाले, माझा प्रश्न आहे की मग गुजराती मारवाडी त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आले? 


🔸• कोश्यारी गुजराती-मारवाडी समाजाला विचारा उद्योगासाठी महाराष्ट्र का निवडला? कारण इथलं उद्योगस्नेही वातावरण त्यांना आकर्षित करतं...ह्या देशावर हिंद प्रांतावर जर १५० वर्ष कोणी राज्य केलं असेल तर आमच्या मराठा साम्राज्याने केलं आहे...महाराष्ट्र मोठा होताच आणि राहील...कोश्यारींकडून महाराष्ट्र समजून घेण्याची मराठी माणसाला गरज नाही...


🔹• सध्या अनेक पक्षांच्या प्रवक्त्यांची टीव्हीवरची भाषा घसरत चालली आहे...काही प्रवक्ते तर बोन्सायच्या झाडाएवढे असतात, पण आपली लायकी विसरून काहीही बोलत सुटतात...


🔸• महाराष्ट्रातला एक मंत्री दूरदर्शनवर महाराष्ट्रातील महिला नेत्याबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो...महाराष्ट्राचं राजकारण इतकं रसातळाला गेलं...हे असंच सुरु ठेवायचं असेल तर महापुरूषांचं नाव घेणं बंद करा...


🔹• घाणेरडी राजकीय संस्कृती आपण माध्यमातून तरुण मुलांसमोर ठेवणार असू तर ही तरुण मुलं काय शिकणार? महाराष्ट्रातून अनेक तरुण-तरुणी नोकरीसाठी परदेशात जात आहेत, का तर महाराष्ट्रात आता फक्त जातीपातीच राजकारण सुरु आहे, सगळं वातावरण प्रदूषित झालं आहे...


🔸• गेल्या ५ वर्षात पाच लाख उद्योजक देश सोडून परदेशात निघून गेले...देशांत फक्त जात-पात आणि महापुरुषांच्यावर टीका करणं इतकंच सुरु आहे...मध्यंतरी महाराष्ट्रात म्हैसूर सॅन्डल सोप (राहुल गांधी ) हे सावरकरांबद्दल वाट्टेल ते बरळून गेले,काय माहिती आहे सावरकरांबद्दल तुम्हाला?


🔹• राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत...राहुल गांधी सावरकरांवर बोलणार, भाजप नेहरूंबद्दल बोलणार, मग अजून कोणतरी अजून एखाद्या महापुरुषांवर बोलणार...हे किती दिवस चालणार, ज्यांनी देशासाठी आयुष्य दिलं त्या सगळ्या महापुरुषांना का बदनाम करताय?


🔸• माझं काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन्ही पक्षांना आवाहन आहे...सावरकर, नेहरू, टिळक ह्यांची बदनामी थांबवा...ह्यातून काय साध्य होतं? बस्स, झालं आता. ह्या देशासमोर आजचे जे ज्वलंत प्रश्न उभे आहेत त्यावर लक्ष देऊया...


🔸• मध्यंतरी पंडित नेहरूंचा एक फोटो समोर आला, ज्यात एक लहान मुलगी नेहरूंचं चुंबन घेत होती, त्यावर नेहरूंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले...अरे ती नेहरूंची नातेवाईक होती...कसले घाणेरडे आरोप करत सुटायचं...हे बदनामीचं सत्र थांबवा आता...


🔹• आपली आदराची स्थानं तरी कोणती? सर्व महापुरुषांवर चिखलफेक सुरु आहे...प्रत्येक व्यक्तीत गुण-दोष असतात ते स्वीकारा...त्यातून जे प्रगतीसाठी उपयुक्त आहे ते घ्या आणि पुढे चला...


🔸• गटाध्यक्षांनी माझ्या विभागाध्यक्षांवर आणि इतर पदाधिकऱ्यांवर अंकुश ठेवावा...तुम्ही तुमचं काम चोख करा...आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर मला सांगा मी त्यांच्याकडे बघून घेईन...मला माझ्याभोवती हुजऱ्यांची गर्दी नको आहे...


🔹• माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, येणाऱ्या निवडणुकीत जी जबाबदारी मिळेल ती जोरकसपणे पार पाडा...मी तुम्हाला शब्द देतो, हा राज ठाकरे महापालिका जिंकून तुमच्या हातात देईल...


-------------------------------------------------------------------






                               

                             जाहिरात











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या