वरध येथील तात्कालीन आरोग्य अधिकारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

 वरध येथील तात्कालीन आरोग्य अधिकारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल                                              


राळेगाव तालुका प्रतिनिधी : विलास साखरकर    

यवतमाळ राळेगाव तालुक्यातील वरध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ प्रतिक वाघमोडे यांच्यावर वडकी पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला तशी तक्रार आरोग्य विभागातील नर्स यांनी दिली होती त्यामध्ये फिर्यादीची प्राथमीक आरोग्य केंद्र वरद येथे आठवडयात प्रत्येक मंगळवारी ड्युटी लागत असते . तेव्हा डॉ . प्रतिक वाघमोडे मला त्यांचे मोबाईल क्रमांकावरुन दिनांक 04/01/2022 रोजी तो मला नेहमी त्याचे मोबाईल वरून दवाखाण्याचे ड्यूटी करीता बोलत होते . त्यानंतर दिनांक 11/01/2022 रोजी मंगळवार दिवस मी वरुड जहागीर येथील डे नाईट डयुटी करीता सकाळी 08/00 वा . दरम्यान वरद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आली असता दिवस भर डयुटी करुन साथ . 05/00 वा . चे दरम्यान मला माझे मोबाईलवर डॉ . प्रतिक वाघमोडे यांचा मोबाईल वरुन व्हॉट्सअप व्दारे अश्लिल भाषेत मैसेज पाठविले अशी जबानी रिपोर्ट फिर्यादी यांनी दिली आहे याआधी फिर्यादी यांनी दिनांक 28/01/2022 रोजी डॉ . प्रतिक वाघमोडे यांनी माझ्यावर अत्याचार केल्याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी यवतमाळ व तालुका आरोग्य अधिकारी राळेगाव , मुख्यकार्यकारी अधिकारी यवतमाळ विशाखा समीती यवतमाळ यांचे कडे डॉ . प्रतिक वाघमोडे यांचेवर कार्यवाही होणेकरीता लेखी तक्रार दिली परंतु त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झाली नाही . त्याचेकडुन माझे जिवीतास धोका आहे . करीत आज रोजी पोलीस स्टेशनला येथुन जवानी रिपोर्ट देत आहे . असेही तक्रारीत नमूद केले यावरून वडकी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी डॉ प्रतिक वाघमोडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या