दर्यापूर येथे निघाली भव्य संविधान सन्मान गौरव रॅली
संविधान सन्मान परिषदेचे यशस्वी आयोजन
दर्यापूर - महेश बुंदे
सविधान सन्मान परिषद दर्यापूर यांच्या वतीने दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून दर्यापूर शहरात भव्य संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य संविधान सन्मान रॅलीची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून करण्यात आली. प्रथमता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यां प्रतिमेला उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून रॅलीला सुरवात झाली.
याप्रसंगी दर्यापूर नगरपरिषद मुख्याधिकारी नंदू परळकर, अधीक्षक राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नीतनवरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे आदी उपस्थित होते.
सदर रॅलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद पार्क येथुन बस स्थानक मार्गे निघाली पुढे पेट्रोल पंप चौकात महात्मा गांधी यांच्या पूतळ्याला हारार्पण करून उपजिल्हा रुग्णालय समोरून दर्यापूर पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करत रॅलीची सांगता झाली.या रॅलीत संविधान सन्मान परिषदेचे शेकडो युवक, शासकीय मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थिनी,साई नगर येथील महिला मंडळाचे सभासद व शहरातील संविधान प्रेमी युवक,युवती,महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीच्या सांगता प्रसंगी पोलीस निरीक्षक किरण औटे, पोलीस उपनिरीक्षक नीतनवरे, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, प्रा.संदीप पांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा ज्ञानेश्वर मेश्राम यांनी केले. सदर संविधान सन्मान रॅली यशस्वी करण्यासाठी संविधान सन्मान परिषदेचे इंजी. नितेश वानखडे, अनिरुद्ध वानखडे, पंकज गावंडे,प्रा ज्ञानेश्वर मेश्राम, प्रा.संदीप पांडेकर, विनोद पवार, बुद्धभूषण गवई, धनंजय देशमुख, मिलींद वानखडे, आशीष वानखडे, आकाश चौरपगार, सुनील गवई, तेजस नितनवरे, शुभम भोरखडे, सचिन वानखडे, प्रतीक नितनवरे व असंख्य युवकांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या