विक्रमगड येथे जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचार , चौकशीची मागणी अंत्यत नित्कृष्ठ दर्जाची कामे

   





विक्रमगड : प्रतिनिधी अजय लहारे

ग्रुप ग्रामपंचायत जांभे अंतर्गत झालेली जल जिवन मिशनची कामे निक्रूष्ट दर्जाची... . . 

   ग्रामस्थांची चौकशीची मागणी. 

   विक्रमगड तालुक्यातील पंचायत समिती विक्रमगडच्या हद्दीत येणारी ग्रुप ग्रामपंचायत जांभे येथील जल जिवन मिशन अंतर्गत झालेली कामे ही निक्रूष्ट दर्जाची झालेली आहेत. फक्त सांगाडा उभा करुन ग्रामसेवकने लाखो रुपयाचे चेक सोडलेले आहेत. 

    ग्रुप ग्रामपंचायत जांभे अंतर्गत एकुण चार महसुल गांव व सोळा लहान-लहान पाडे येतात.ग्रुप ग्रामपंचायत जांभेच्या गांव पाड्यांना नेहमीच पाणी टंचाई भासत आहे. परंतु शासनाच्या जल जिवन मिशन योजने अंतर्गत शाळा,अंगणवाडी,ग्रामपंचायत कार्यालय व दवाखान्यामध्ये काही-शी पाण्याची टंचाई कमी होणार होती,परंतु ग्रामपंचयतीने फक्त सांगाडे उभे करुन बिलं काढण्यासाठी नळ योजना चालु केली आणि परत त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिले नाही. 

     ग्रामपंचायती अंतर्गत येणारं महसुल गांव अंधेरी ह्या ठिकाणी चक्क रिकाम्या बोरवेल मध्ये मोटार टाकुन फक्त नळ योजना दाखवुन लाखो रुपयाचे बिलं काढल्याचे तिथील ग्रामस्थांचे मत आहे.

     तसेच ग्रामस्थांनी ग्रामसेवकाकडे ग्राम आराखडा मागितला असता,चक्क ग्रामसेवक दादागिरीची भाषा वापरुन आराखडा दाखवण्यास टाळा-टाळ करित आहे. जणु ग्रामसेवकाचे ग्रामस्थांवरती व ग्रामपंचायतीवरती स्व:शासन चालवित आहे.

      अश्या निक्रूष्ट दर्जांच्या कामांची चौकशी व्हावी व अश्या स्व:शासन चालवत असलेल्या ग्रामसेवकावरती कठोर कारवाई व्हावी हिच अपेक्षा. . . 

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या