पालघर प्रतिनिधी : हेमंत घाटाळ
विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय चेतन खंदारे या विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पालघर – बोईसर रस्त्यावरील (Palghar Crime) उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. चेतनची हत्या (Murder) झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
तीन आठवड्यांपासून बेपत्ता
पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. तीन मार्चपासून 21 वर्षीय चेतन खंदारे बेपत्ता असल्याची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात दाखल होती. चेतन पालघरमधील सेंट जॉन्स कॉलेजमधील सिव्हिल इंजिनिरंगमध्ये शेवटच्या वर्षातील विद्यार्थी होता.
मोहरे ब्रिजजवळ कुजलेला मृतदेह
कुजलेल्या अवस्थेतील चेतनचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ माजली आहे. पालघर – बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ त्याचा मृतदेह आढळला. पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चेतनची हत्या झाल्याचा आरोपी कुटुंबियांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र त्याने आत्महत्या केली, त्याच्यासोबत घातपात झाला, की त्याचा अपघात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील तपास पालघर पोलीस निरीक्षक करत आहेत.
0 टिप्पण्या