अपंग दिव्यांगाला भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आधार

 


ठाणे प्रतिनिधी : 



भारतीय समाजव्यवस्था ही संवेदनशील मनाची आहे तसेच परोपकारी वृत्तिमुळे समाजाचे ऋण फेडण्याची प्रत्येकाची ईच्छा असते, समाजातील सबळ लोकांनी दुर्बल लोकांसाठी काही करता येत असेल तर नक्कीच करावे किंवा मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा हा संकल्प बाळगलेले भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सुनिल धोंडे यांनी मयुर मते या जन्मतः दिव्याग असलेल्या मुलाची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांना दिली, समाजातील दूर्बल व वंचित लोकांसाठी कार्य करणारे सुंदर डांगे यांनी सदैव समाजकार्यात अग्रेसर असलेले दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय शंकर पवार यांच्याकडे दिव्यांग मुलासाठी मदतीची याचना केली असता त्यानी लगेच होकार दिला व मयुर मते या दिव्यांग मुलाला व्हिलचेअर भेट देऊन त्याचा यथोचित सन्मान केला.

            माझ्या मुलाला भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिळालेली भेट म्हणजे आमचे दुःख समजून व्यक्त केलेली सहानुभुती आहे असे बाळाराम मते यांनी आभार व्यक्त करतांना सांगीतले.

        एखाद्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करता आले तर मनाला समाधान वाटते असे विचार संस्थेचे कार्याध्यक्ष सुनिल धोंडे यांनी मांडले.

             सन्मानाने जिवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यासाठी आपण सदैव प्रयत्नशिल असतो, सामाजिक कार्य करण्यासाठी फक्त प्रबळ ईच्छाशक्ति व संवेदनशील मन असावे लागते अन ते मला माझे आधारस्तंभ असलेले दानशूर शंकर पवार यांच्यामुळे शक्य होत असल्याचे प्रांजळ मत संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी व्यक्त केले.

             ज्या परीस्थीतीला मी सामोरे गेलो आहे तशी परीस्थीती कुणावर ही येऊ नये, आजच्या ऐश्वर्यात माझ्यावर बेतलेल्या प्रसंगांची झळ आहे म्हणून मला गरीबांची सेवा करणे आवडते   यात कुठलाही मोठेपणा नसून हे तर आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे विचार आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय शंकर पवार यांनी  व्यक्त केले.

     ठाणे येथील आॅल इंडिया बंजारा सेवा संघाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी सन्माननीय शंकर पवार, सुंदर डांगे, सुनिल धोंडे, बाळाराम मते, मनीलाल डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या