ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन मार्फंत युनिव्हर्सल पास व कालदर्शिकेचे वाटप
चाळीसगांव : दि.२६ नागरिकांना मिळणार्या शासनाच्या सोयी सुविधा सोयीचे व्हावे या हेतूने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून
ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनमार्फंत युनिव्हर्सल पास तसेच कालदर्शिका मोफत वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करणे सुलभ जावे यासाठी शासनाकडुन ई-पास सेवा सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना ई-पास काढणे अवघड वाटते.म्हणुन अगदी ई पास सहज उपलब्ध व्हावे.याकरीता विधानसभा आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाकडुन युनिव्हर्सल पास मोफत काढुन देण्याची सुविधा सुरु आहे.अवालिया अशोक राठोड यांनी या सुविधेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिले.अवालिया अशोक राठोड यांच्याकडुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वेगवेगळ्या योजनेविषयी जनजागृती,बेटी बचाव बेटी पढाव, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार नोंदणी,वृक्षारोपण,शालेय साहित्यांचे वाटप,स्वच्छता अभियान यांसारखे समाजाच्या हीताचे विविध उपक्रमाचे सत्कृत्य त्यांच्याद्वारे अविरतपणे घडत आहे.सदर याप्रसंगी ओढरे ग्रामपंचायत सदस्या सौ भारती राठोड,सारिका पवार, भुलिबाई राठोड, संगीता चव्हाण, सविता चव्हाण, संगीता चव्हाण, अंगणवाडी सेविका पद्माबाई गोपाळ, सुमनबाई राठोड,लक्ष्मी राठोड,जेष्ठ नागरिक नामदेव चव्हाण, नामदेव राठोड, गोकुळ चव्हाण, गणेश राठोड, राहुल राठोड, शिवानंद राठोड, पितांबर पवार, विक्की राठोड,पप्पू पवार, आकाश राठोड, हिम्मत चव्हाण, नवनाथ पवार आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या