शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात पाठविण्याचे प्रशासनाचे षडयंत्र – यशवंत परशुरामकर

 शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात पाठविण्याचे प्रशासनाचे षडयंत्र  – यशवंत परशुरामकर

   ३० सप्टेंबर पर्यंत नोंदणी अशक्य ,ई- पिक आणि सात - बारा नोंदणीची मुदत वाढवून देण्याची केली मागणी 

अर्जुनी मोरगाव

श्रीधर हटवार 

    शासनाने सुरू केलेली "ई-पीक पाहणी ही मोहीम शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरत आहे,शासनाने सुरू केलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यासाठी किचकट असताना दुसरीकडे प्रशासनाने खरीप हंगामाकरिता धान खरेदीसाठी ७/१२ ऑनलाईन करण्याचीही मुदत ३० सप्टेंबरच दिल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ई –पिक नोंदणी झाल्याशिवाय खरिपाच्या धान विक्रीची नोंदनी शेतकरी करू शकत नाही.त्यामुळे अनेक शेतकरी नोंदणीविना ठेऊन खाजगी व्यापाऱ्याच्या दारात पाठविण्याचे प्रशासनकिय अधिकाऱ्यांचे  हे षड्यंत्र असून,ई –पिक नोंदणी व धान खरेदी नोंदणीची मुदत वाढवून द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते यशवंतराव परशुरामकर यांनी केली आहे.

          राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून "माझी शेती, माझा सातबारा,मीच नोंदविणार माझा पिक पेरा" ही ई-पीक पाहणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.पिकासंदर्भातील माहिती अॅपवर कशी भरावी याबाबतची कुठलीही माहिती शेतकऱ्यांना नाही.तालुक्यात ६० हजाराच्या शेतकऱ्यांची संख्या असून,बहुतांश शेतकरी शेतात जाऊन 'ऑन द स्पॉट' पीक पाहणी अॅपवर ही माहिती भरतात मात्र त्यांना अनेक तांत्रिक समस्याला तोंड द्यावे लागत आहे.असे असताना दुसरीकडे खरिपाच्या धान खरेदीसाठी ७/१२ नोंदणी करण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर ठेवल्याने शेतकरी चांगलाच भांबावून गेला आहे. ई –पिक नोंदणी करून पिकाचा  खसरा भरला  गेले नाही तर धान खरेदीसाठी खरेदी केंद्र नोंदणी करू शकत नाही.मग इतक्या कमी कालवधीत ई –पिक नोंदणी व धान खरेदी नोंदणीची कशी शक्य आहे.नोंदणी करिता मुदतवाढ करावी अन्यथा अनेक शेतकरी नोंदणी विना राहून आपोआपच खाजगी व्यापाऱ्याच्या दारावर जातील.त्यामुळे प्रशासनाने यावर गांभीर्याने दखल घेऊन मुदत वाढ करावी अन्यथा नाईलाजाणे आम्हाला रस्त्यावर उतरवावे लागेल असे राष्ट्रवादीचे नेते यशवंतराव परशुरामकर म्हणाले. 


शेतकरी गोंधळात


ई-पीक पाहणी मोहीम चांगली पण पीकासंदर्भातील माहिती भरणे, स्लोली सर्व्हर चालने, एका पिकाची माहिती अॅपवर अपलोड करण्यास किमान २० ते ३० मिनिट तरी लागतात. आपण माहिती अचूक की चुकीची भरली हे पाहण्यासाठी पर्याय नसल्याने शेतकरी गोंधळात अडकले आहेत. शिवाय तांत्रिक अडचणीचाही सामना करावा लागत असल्याने ई-पीक पहाणी मोहीम शेतकऱ्याची सद्यातरी डोकेदुखी ठरत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या