इटीयाडोह धरण येथे १० लाखाच्या शौचालयाने पर्यटनात टाकली भर
निकृष्ट बांधकाम; संगनमताने २५ लाखांच्या निधीची विल्हेवाट बांधकामात अनियमितता व गुणवत्तेत घसरण
श्रीधर हटवार
गोंदिया,अर्जुनी मोरगाव-:- अर्जुनी मोरगाव तालुक्याचे वैभव असलेले इटियाडोह धरण परिसरात पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत १० लाखांचे शौचालय व १५ लाखाचे पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करण्यात आले.या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व कामाची गुणवत्ता खालावली असल्याचे दिसून येते.सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने पर्यटक जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यावर संताप व्यक्त करत इटीयाडोह धरण पर्यटन स्थळात १० लाखाच्या शौचालयाने भर टाकली असुन,हे कृत्य बघायला अनेकांना आमंत्रित करीत आहेत.
शौचालयावर १० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असेल तर त्या शौचालयाचे बांधकाम कसे असणार? हे देखील उत्सुकतेचे आहे.शासन घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी दिड लाखांचा निधी देतो.या दिड लाखात लाभार्थी कसे घरकुलाचे बांधकाम करीत असेल.आणि दुसरीकडे पर्यटन विकासाचे नावावर शासनाची दिशाभूल करून शौचालयाचे बांधकामांवर १० लाख रुपयांचे निधी मंजूर करून या निधीची परस्पर विल्हेवाट लावली जाते.प्रत्यक्ष बांधकाम ठिकाणी गेल्यावर बांधकामांची खालावलेली गुणवत्ता व अनियमितता दिसून येते.गोठणगाव येथील इटियाडोह धरणावर पर्यटन विकासांतर्गत १० लाखांच्या निधीतून शौचालय व १५ लाखांच्या निधीतून पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करण्यात आले.एकंदरीत अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने २५ लाखांच्या निधीची सोयीस्करपणे विल्हेवाट लावण्यात आली.हे प्रत्यक्षदर्शी दिसून येते.या भ्रष्टाचारावर संबंधित विभाग किती पांघरूण घालत आहे.याकडे पर्यटकांसह तालुकावासींयाचे लक्ष लागले आहे.
"स्वच्छ भारत मिशन"अंतर्गत स्वच्छतेवर भर देत प्रत्येक कुटुंबाला १२ हजार रुपयांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी दिले जाते.या अनुदानासाठीही लाभार्थी कुटूंब संबंधित कार्यालयाच्या अनेक हेलपाटे मारतो.एवढेच नव्हेतर बांधकाम दरम्यान अनेक बाबींची पूर्तताही लाभार्थ्यांना करावी लागते.किंबहूना यंत्रणेतील अधिका-याकडून त्या पुर्तता करून घेण्याचा अट्टहास धरला जातो.मात्र १० लाखांच्या निधीतून शौचालयाचे बांधकाम झाले असेल तर त्या अभियंत्यांनी कसे काय हे पचविले असावे,याचा अंदाज बांधणेही कठीण आहे.
गोठणगाव येथील इटियाडोह धरण पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी १० लाख रुपये निधीचे शौचालय बांधकाम व १५ लाख रुपये निधीचे पेव्हर ब्लॉकचे बांधकामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.त्या अंदाजपत्रकालाही रितसर मंजूरी प्रदान करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बांधकाम ग्रा.प.गोठणगावच्या माध्यमातून करण्यात आले.या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे.हे उघडपणे पहावयास मिळते.निकृष्ट बांधकाम आणि त्यावर खर्च केलेला निधी या प्रकाराबाबत पर्यटक व तालुका वासीयसुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
सदर बांधकामा दरम्यान सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.? अंदाजपत्रकानुसार ५० टक्केही काम झाले नाही.यावरून निकृष्ट बांधकामाला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसे खपवून घेतले? हे न सुटणारे कोडे आहे.
*आ.मनोहर चंद्रिकापुरेंनी लक्ष घालावे - ईटीयाडोह स्वरक्षण व संवर्धन समिती*
=================
गोठणगाव येथील इटियाडोह धरण परिसरात १०लाखाच्या निधीतून शौचालयाचे बांधकाम व १५ लाखांच्या निधीतून पेव्हर ब्लॉकचे निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे.या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचे तसेच कामात अनियमितता दिसत असून अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आले नसल्याचे दिसून येते.या कामात कायद्याचे उल्लंघन झाले असून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे.संबंधित कामावर असलेले अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.या निकृष्ट बांधकामात सहभागी असलेल्या कंत्राटदारासह संबंधित अभियंताची तक्रार पर्यटन मंत्रालयाकडे ईटीयाडोह स्वरक्षण व समितीने केली आहे .आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांनी सुद्धा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी या नात्याने लक्ष घालून या बांधकामात दोषी असणाऱ्यां अधिकाऱ्यांची तक्रार पर्यटन विभागाकडे करून जनतेच्या मागणीला न्याय द्यावा अशी मागणी ईटीयाडोह स्वरक्षण समिती,पर्यटकासह तालुकावासींयांनी केली आहे
0 टिप्पण्या